पुढील वर्षापासून शाळांतर्गत 20 गुण बंद शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

दहावीसाठी शाळास्तरावर प्रात्यक्षिकाचे दिले जाणारे 20 गुण पुढील वर्षीपासून बंद केले जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली.

कोल्हापूर : दहावीसाठी शाळास्तरावर प्रात्यक्षिकाचे दिले जाणारे 20 गुण पुढील वर्षीपासून बंद केले जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली. तसेच, यापुढे खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्येही शिक्षक भरती शासनाच्या "पवित्र पोर्टल' प्रणालीद्वारे केली जाणार असल्याचेही तावडे यांनी नमूद केले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे जन्मशताब्दी महोत्सव शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील होते. 

तावडे म्हणाले की, राज्यातील 98 टक्के शाळांनी 20 पैकी 18 मार्क दिले आहेत. हे कसे शक्‍य आहे. विद्यार्थांना दहावीमध्ये पास करण्यासाठी खटाटोप करतो आणि त्याला पुढे अडकवून ठेवतो. त्यामुळे दहावीच्या पाया पक्का झाला पाहिजे. यासाठी शाळा स्तरावर असणारे 20 गुण पुढील वर्षीपासून बंद केले जातील. तसेच, खासगी संस्थांमध्ये पोर्टल प्रणालीद्वारेच शिक्षक भरती केली जाईल. त्यामुळे कोणालाही आपल्या आईचे दागिने आणि बापाची जमीन विक्री करावी लागणार नाही. अनेक संस्था दहा-दहा लाख रुपये घेवून शिक्षक भरती करतात. त्यांना चाप बसणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले. यावेळी, संस्थेच अभयकुमार साळुंखे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, डॉ. डी. वाय. पाटील, प्राचार्य शुभांगी गावडे उपस्थित होते. 

Web Title: Education Minister Vinod Tawde, announced cancel 20 marks school from next year