वरिष्ठ निवडश्रेणीच्या जाचक अटींविरोधात याचिकेची तयारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

प्राथमिक व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने 23 ऑक्‍टोबरच्या अध्यादेशात अट घातली आहे. ही अट, शर्त सेवा ज्येष्ठता कायद्याचा भंग करणारी आहे.

सांगली : प्राथमिक व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने 23 ऑक्‍टोबरच्या अध्यादेशात अट घातली आहे. ही अट, शर्त सेवा ज्येष्ठता कायद्याचा भंग करणारी आहे. त्यामुळे या जाचक अटीविरोधात अभ्यासपूर्व याचिका दाखल करण्याची तयारी शिक्षक भारती संघटनेने सुरू केली. 

आमदार कपिल पाटील यांनी या मुद्यावरून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. वरिष्ठ व निवडश्रेणीतील जाचक अट रद्द करावी, यासाठी शिक्षक भारती संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी तयारी सुरू केली. वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी पात्र शिक्षकांशी संपर्क साधला जात आहे. 

Web Title: Education Senior Selection Category Strict Rules Petition