इस्लामपूर हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य बॅंक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

इस्लामपूर - ज्यांना खरोखरच समाजासाठी काहीतरी करायचे आहे किंवा किमान सामाजिक जाणिवा जपायच्या आहेत, अशांना अनेक मार्ग दिसतात. शालेय पातळीवर गरीब, गरजूंना दिखाऊपणाने मदत करणारे,  त्या कामाच्या प्रसिद्धीचा स्टंट करणारे अनेक आहेत.  परंतु काहीतरी दान द्यायचे आणि तेही गुपित ठेवायचे; याशिवाय वंचित, सर्वहारा वर्गातील मुलांना लाभ  द्यायचा, अशी अभिनव योजना येथील इस्लामपूर हायस्कूलमध्ये राबवण्यात आली आहे. शाळेने या उपक्रमाला ‘शैक्षणिक साहित्य संचयिका बॅंक’ असे नाव दिले आहे.

समाजात असे अनेक गरजू विद्यार्थी आहेत. जे शैक्षणिक साहित्य मिळत नसल्याने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. अपुऱ्या साहित्यामुळे एकूण प्रक्रियेत ते ‘मागास’ ठरत आहेत. दानत असणाऱ्या लोकांकडून त्यांना आधाराची गरज असते. अलीकडे मात्र ‘दान’ प्रकरण निव्वळ प्रसिद्धीचा भाग बनले आहे. त्यातील सामाजिक भान लोप पावत चालले आहे. 
मुख्याध्यापक ए. आर. खटावकर यांनी इस्लामपूर हायस्कूलमध्ये गरीब मुलांची स्थिती पाहून ‘शैक्षणिक साहित्य संचयिका बॅंक’ अशी अभिनव योजना सुरू केली. तिला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

परिस्थितीअभावी ज्यांना गरजेइतके शैक्षणिक साहित्य मिळत नाही अशांसाठी ही बॅंक आधार ठरली आहे. ज्यांना औचित्याने काहीतरी देणगी द्यायची आहे, अशांकडून रक्कम, वस्तू रूपात देणगी स्वीकारली जाते. ‘या कानाचे त्या कानाला न कळता’ हे साहित्य संबंधित मुलांपर्यंत पोहोचवले जाते. 

१५ जून २०१६ पासून श्री. खटावकर यांनी उपक्रम  सुरू केला. त्याला समाजाच्या सर्व स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पालक, आजी-माजी विद्यार्थ्यांकडून वह्या, पेन, कंपास, गणवेश या रूपात मदत मिळते. मदत करणाऱ्यांचे प्रार्थनेवेळी कौतुक केले जाते. या अभिनव योजनेतून काही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, परीक्षेचे शुल्कही भरण्यात येते. सर्व देवघेवीच्या नोंदीही ठेवल्या जात आहेत. 

सामान्य विद्यार्थी प्रवाहापासून बाजूला राहू नये म्हणून योजना राबवली आहे. शाळा समितीचे अध्यक्ष प्रा. एस. के. कुलकर्णी यांचे आहे. योजनेमुळे गरजू मुलांना चांगली मदत होते. लोकांनी चांगल्या भावनेने दिलेली मदत सत्कारणी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न शाळा करते.
- ए. आर. खटावकर, मुख्याध्यापक

Web Title: educational equipment bank in islampur high school