सातारच्या लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यास दोन दिवस पोलिस कोठडी 

सिद्धार्थ लाटकर
मंगळवार, 8 मे 2018

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव हिला आज जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सातारा - फरक बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव हिला आज जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

संबंधित तक्रारदाराने फरक बिलाची रक्कम मिळण्यासाठी जिल्हा परिषदेत अर्ज केला होता. ही रक्कम मिळवून देण्यासाठी श्रीमती गुरव यांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पडताळणीमध्ये तडजोडी अंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार 10 हजार रुपयांची रक्कम घेताना श्रीमती गुरव यांना सोमवारी (ता. 7) त्यांच्याच कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज (मंगळवार) दुपारी अडीच वाजता श्रीमती गुरव यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 10 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Educational Officer Sent To Police Custody For Two Days