esakal | मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत : जयंत पाटील... 13 दिवसात उभारलेल्या सेवासदन कोव्हीड चेस्ट सेंटरचे उद्‌घाटन 
sakal

बोलून बातमी शोधा

Sevasadan.jpg

मिरज(सांगली) -  सध्याच्या कोरोना साथीतचच नव्हे तर अन्य आजारांमध्येही मृत्युदर कमी करण्याचे मोठे आव्हान डॉक्‍टरांसमोर आहे. केवळ कोरोनासह अन्य व्याधींच्या उपचारांतही डॉक्‍टरांनी मृत्यूदर कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज केले.

मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत : जयंत पाटील... 13 दिवसात उभारलेल्या सेवासदन कोव्हीड चेस्ट सेंटरचे उद्‌घाटन 

sakal_logo
By
प्रमोद जेरे

मिरज(सांगली) -  सध्याच्या कोरोना साथीतचच नव्हे तर अन्य आजारांमध्येही मृत्युदर कमी करण्याचे मोठे आव्हान डॉक्‍टरांसमोर आहे. केवळ कोरोनासह अन्य व्याधींच्या उपचारांतही डॉक्‍टरांनी मृत्यूदर कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज केले.

सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलने नव्याने सुरू केलेल्या सेवासदन कोव्हीड चेस्ट सेंटरचे उद्‌घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते आज झाले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, खासदार संजय पाटील आदिच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. 

श्री. पाटील म्हणाले,""कोरोनावरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांनी स्वतःहून पुढे येऊन स्वतंत्र उपचार केंद्रे सुरु करणे गरजेचे आहे. सरकारी यंत्रणाही सहकार्य करेल. सेवासदन रुग्णालयाने एक नवे मॉडेल निर्माण केले. तेरा दिवसांत पन्नास खाटांच्या कोव्हीड सेंटरची उभारणी करण्याच्या डॉ. रविकांत पाटील यांच्या प्रयत्नांची शासन दखल घेईल. समाजानेही दखल घ्यावी. येथील अद्यावत यंत्रसामुग्री, निष्णात कर्मचा-यांची यंत्रणा ही कोरोनाग्रस्तांसाठी संजीवनी ठरेल.'' 

रुग्णालयाचे संस्थापक डॉ. पाटील यांनी प्रास्ताविक केले. 13 दिवसात 50 खाटांच्या रुग्णालयाची उभारणी करणे हे आव्हान होते. सरकारी यंत्रणांनीही मोलाची साथ दिली. 17 विभागांच्या परवानग्या, वीज, पाणी पुरवठासारखी महापालिकेसह यंत्रणेने अतिशय मोलाचे सहकार्य केल्याचे सांगितले. 

संजयकाकांना भेटा -

खासदार संजय पाटील यांची फिरकी घेण्याची संधी पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोडली नाही. कोरोनाच नव्हे तर अन्य कोणत्याही व्याधींवर वैद्यकिय उपचारांचा उपयोग होत नाही, असे जाणवले तर रुग्णांच्या नातेवाईकांनी खासदार संजय पाटील यांची भेट घ्यावी. कारण त्यांच्याकडे अशा किचकट व्याधी ब-या करणा-या हजारो साधू, महाराजांची मोठी यादी आहे. यापैकी किल्लेमच्छिंद्रगड येथेही ते मान्यवरांसह येत असतात, असे सांगताच हास्यकल्लोळच उडाला. 
 

संपादन : घनशाम नवाथे