#EID मंगळवेढ्यात इदचा उत्साह

हुकूम मुलाणी
शनिवार, 16 जून 2018

मंगळवेढा - मंगळवेढा शहर व तालुक्यात रमझान ईद ऊत्साहात साजरी करण्यात आली. आज सांगोला रोडवरील ईदाह मैदान शहरातील विविध ठिकाणी असलेल्या मशीदीमध्ये ईद ऊल फित्रच्या नमाजाचे पठण करण्यात आले. 

याशिवाय ग्रामीण भागातील सिध्दापूर मरवडे जित्ती, भाळवणी, निंबोणी, सलगर, बुभोसे नंदेश्वर, आंधळगाव, डोणज, नंदूर, बावच लंवगी, ब्रम्हपुरी, बोराळे, मारोळी, हुन्नुर, खुपसंगी गावातही नमाजाचे पठण मुस्लिम बांधवानी करत एकमेकाला आलिंगन देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अल्लाकडे शेतीसाठी चांगला पाऊस पीक कुटूंबात सुख समृध्दी रहावी याची दुवा मागण्यात आली. ईद निमित्त आ.भारत भालके, आ.प्रशांत, परिचारक दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, बबनराव आवताडे, शहा बँकेचे अध्यक्ष राहूल शहा, सभापती प्रदीप खांडेकर, नगराध्यराध्यक्षा अरूणा माळी, समाजकल्याण सभापती शिला शिवशरण, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार आप्पासाहेब समींदर, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, गटविकास अधिकारी राजेन्द्रकुमार जाधव, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, दामाजीचे उपाध्यक्ष आंबादास कुलकर्णी, भैरवनाथ कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल सावंत, शशिकांत चव्हाण, राजेन्द्र सुरवसे, गौरीशंकर बुरकूल, येताळा भगत, मारूती वाकडे, महेश दत्तू, सुहास पवार, वारी परिवाराचे सतीश दत्तु सोमनाथ आवताडे, सिध्देश्वर आवताडे, आदीसह विविध पक्षाच्या नेत्यानी व हिंदू मित्र मंडळीनी मुस्लीम बांधवाना शुभेच्छा देत शिरखुर्म्याचा व गुलगुल्याचा आस्वाद घेतला.

Web Title: #EID Enthusiasm for EID celebration