डंपर विक्री व्यवहारातून साडेआठ लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

कोल्हापूर - डंपरच्या विक्रीचा व्यवहार करून देतो म्हणून साडेआठ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद दिनकर भिवा देशमुख (वय 60, रा. माळ्याची शिरोली, करवीर) यांनी दिली. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे दीपक दिलीप लादे (रा. औंढ, ता. कऱ्हाड, जि. सातारा), किशोर संभाजी पाटील (रा. गोकुळ शिरगाव) आणि इम्तियाज अन्वर मुजावर (रा. कसबा बावडा) अशी आहेत.

डंपर मालक देशमुख व किशोर पाटील यांची ओळख होती. किशोर पाटीलने ओळखीचा फायदा घेत मित्र दिलीप लादे याला डंपर विक्री करतो, असे देशमुख यांना सांगितले. त्यानुसार त्याने 5 सप्टेंबर 2014 रोजी हा डंपर विक्री केला. त्याचे संचकारपत्र केले. त्या व्यवहारातील दीड लाख रुपयांचा धनादेश लादेने देशमुख यांना दिला. डंपरवरील इतर फायनान्स कंपनीचे 8 लाख 45 हजारांचे कर्ज फेड करू, असे त्याने लिहून दिले. हा सर्व व्यवहार दसरा चौकात झाला. मात्र, दिलेला धनादेशही वटला नाही. त्यामुळे देशमुख यांनी डंपर नाही तर त्याचे पैसे द्या, असा तगादा लादे व पाटील या दोघांकडे लावला. यात मुजावरने मध्यस्थी केली. मात्र, आजअखेर त्या तिघांनी डंपर अगर त्याचे पैसे दिले नसल्याचे देशमुख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक दादा पवार तपास करीत आहेत.

Web Title: Eight and a half lakh fraud case