Loksabha2019 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कऱहाडला तीन दिवसात साडेआठ लाख जप्त 

हेमंत पवार 
मंगळवार, 2 एप्रिल 2019

कऱ्हाड - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड (जि.सातारा) पोलिसांनी तीन दिवसात डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पिस्टल आणि 8 लाख 55 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. संबंधित रक्कम महसुल आणि पोलिसांच्या संयुक्तपणे स्थापन केलेल्या भरारी पथकाकडे पुढील चौकशीसाठी सुपुर्द करण्यात आल्याची माहिती डीवाएसपी ढवळे यांनी दिली. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सातारा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्ह्याधीकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हिंम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी विधुत वारखेडकर, डीवायएसपी ढवळे, कराडचे वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, कराड तालुका पोलिस निरीक्षक अशोकराव क्षिरसागर, तळबीडच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, उंब्रजचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने पैसे, दारु, अंमली पदार्थांची वाहतुक होते आहे का याची तपासणी सध्या पोलिस यंत्रणेकडून सुरु आहे. अवैध दारू, अंमली पदार्थ, रोकडची वाहतुक केली जावु नये याच्या तपासणीसाठी बंदोबस्तात आणि चेकपोस्टच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. तालुक्यात शेणोली चौक, मालखेड फाटा, उंडाळे फाटा, शामगाव फाटा, सुर्ली घाट, तासवडे टोलनाका या महत्त्वाच्या ठिकाणांसह कऱ्हाड शहर व परिसरात पहिल्या असणाऱ्या चेकपोस्टवरही वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत उंब्रज येथे 4 लाख 90 हजार, मालखेड फाटा येथे 1 लाख 75 हजार आणि तासवडे टोलनाक्यावर १ लाख ९० हजार रुपयांचे रोकड आणि एक पिस्टल सापडले आहे. ते पुढील चौकशीसाठी महसुल आणि पोलिसांच्या संयुक्त भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने गैरप्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही डीवायएपी ढवळे यांनी दिला आहे.

Web Title: eight lakhs seized in three days at Karhad