सागावच्या अंगणवाडीत आठ कुपोषीत बालके 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

सागाव : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्‍यातील सागाव येथील अंगणवाडींना सरपंच व उपसरपंच यांनी अचानक भेटी दिल्यानंतर येथे आठ कुपोषीत बालके असल्याचे निदर्शनास आले. सागांव येथे सात अंगणवाडीतून सध्या अध्ययनाचे काम चालते, गावामध्ये एकूण सात अंगणवाड्या असून त्यापैकी चार अंगणवाडीना स्वतःची इमारत आहे. तर दोन अंगणवाडी खाजगी मालकीच्या जागेमध्ये आहेत.

सरपंच तात्या पाटील, उपसरपंच सत्यजित पाटील यांनी या अंगणवाड्यांना सकाळी अचानक भेट दिली. त्यामध्ये पटसंख्या,पोषण आहार, कुपोषित बालके याची माहिती घेतली तर संपूर्ण गावामध्ये आठ कुपोषित बालके असल्याचे निदर्शनास आले. तसेच आंगणवाडीच्या समस्या ही जाणून घेऊन लवकरच त्याची पूर्तता करण्याची पदाधिकार्यांनी ग्वाही दिली. यावेळी सरपंच तात्या पाटील, उपसरपंच सत्यजित पाटील, ग्रामविकास अधिकारी वाय. डी. वाघमारे व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेविका उपस्थित होत्या. यावेळी सरपंच तात्या पाटील व उपसरपंच सत्यजित पाटील म्हणाले," जी आठ बालके कुपोषीत आहेत, त्यांना सद्रूड करण्यासाठी ग्रामपंचात प्रीयदर्शनी महिला बचत गट यांनी पोषण आहाराची जबाबदारी घेतली आहे. यामध्ये दुध, अंडी, फळे दिली जाणार आहेत." 

"कमी वजनाची मुले असतील तर त्यांना कुपोषीत म्हणता येणार नाही. नऊ गावामध्ये तीस अंगणवाड्या आहेत. यामध्ये आठ कमी वजनाची मुले आहेत. यामध्ये सौम्य आणि तिव्र असे दोन कुपोषनाचे प्रकार आहेत. ही आठ मुले सौम्य कुपोषन प्रकारामध्ये मोडू शकतात." 
- डॉ. डी. बी. निर्मळे, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र

Web Title: Eight malnourished children in Sagoans Anganwadi