जलकुंभाचा स्लॅब कोसळल्याने आठ कामगार गंभीर जखमी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

नगर तालुका - नगर-मनमाड रस्यावरील एमआयडीसीच्या पाणीसाठ्यासाठी बांधकाम सुरु असलेल्या पाण्याच्या टाकीचे दोन स्लॅब कोसळून आठ जण गंभीर जखमी झाले. आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. एमआयडीसी पोलिस व स्थानिक नागरीकांनी तातडीने मदतकार्य सुरु केले असून, स्लॅबखाली अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यात आली. त्यांना नगरमधील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. 

जखमींमध्ये मध्यप्रदेश व बिहारमधील कामगारांचा समावेश आहे. नीलेश जयराज रामेश्‍वर, अली अन्सारी, अशोक जावेद, गनुसिंग अशी यातील अत्यवस्थ रुग्णांची नावे आहेत. 

प्रथमदर्शनी स्लॅबसाठी अन्य बांधकामात वाळूऐवजी दगडाची कच वापरली असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा स्लॅब कोसळला असावा, असे समजते. यातील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब चार दिवसांपूर्वी टाकलेला होता. औरंगाबाद येथील शारदा इन्फास्ट्रक्‍चर या ठेकेदार कंपनीकडे कामाची जबाबदारी असल्याचे समजते. 

Web Title: Eight workers seriously injured after collapse of Jal Kumbh slab