सांगली कारागृहातील अठरा कैद्यांना सोडले 

2Corona_25.jpg
2Corona_25.jpg


सांगली ः कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव व तुरूंगातील कैद्यांची गर्दी यामुळे न्यायालयाने कैद्यांना पॅरोलवर किंवा अंतरीम जामिनावर सोडण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार येथील मध्यवर्ती कारागृहातील 18 कैद्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार अंतरिम जामिनावर सोडण्यात आले. 

जगभर परसेला कोरोना व्हायरस महाराष्ट्रातही पाय पसरू लागला आहे. सांगली जिल्ह्यात 25 कोरोना बाधितांचा संख्या झाल्याने जिल्हा प्रशासन खबरदारी घेत आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. कारागृहातील कैद्यांची गर्दी पाहता तेथील कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार राज्यभर अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, अंडर ट्रायल कैद्यी म्हणजेच कच्चे कैदी असलेल्यांना अंतरिम जामिनाच्या सुटकेबाबत समिती गठित करण्यात आली. त्यानुसार त्यांची सुटका होऊ शकते, हे समितीमार्फत ठरवण्यात आले. त्यानुसार राज्यातील अनेक जिल्हा, मध्यवर्ती कारागृहात अंमलबजावणी सुरू झाली आहे. 

सांगलीतील मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 235 आहेत. सद्यस्थितीत याठिकाणी 332 कच्चे कैदी ठेवण्यात आलेत. त्यापैकी ज्या कच्च्या कैद्यांवर किरकोळ गुन्हे दाखल आहेत. अशा 18 जणांचे प्रस्ताव जिल्हा न्यायालयाच्या समितीकडे सादर करण्यात आले. त्यानुसार त्यांची सुटका करण्यात आली. त्यात सर्व कैदी पुरूष आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com