आठव्या दिवशीही आर्थिक उलाढाल ठप्पच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - बाजारात 500 रुपयांची नवी नोट नाही, 2 हजारांची नवी नोट कोण स्वीकारत नाही, 100 व 50 च्या नोटांचा अपुरा पुरवठा आणि दैनंदिन व्यवहारात 500 व 1000 ची नोट स्वीकारण्यास होत असलेल्या नकारामुळे नोटांवरील निर्बंधानंतर आठ दिवसांनीही अर्थिक उलाढाल ठप्प आहे. 

कोल्हापूर - बाजारात 500 रुपयांची नवी नोट नाही, 2 हजारांची नवी नोट कोण स्वीकारत नाही, 100 व 50 च्या नोटांचा अपुरा पुरवठा आणि दैनंदिन व्यवहारात 500 व 1000 ची नोट स्वीकारण्यास होत असलेल्या नकारामुळे नोटांवरील निर्बंधानंतर आठ दिवसांनीही अर्थिक उलाढाल ठप्प आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून चलनातील 500 व 1000च्या नोटांवर बंदी घातली. 11 नोव्हेंबरपासून जुन्या नोटा बदलून प्रत्येकी चार हजार रुपये देण्याची प्रक्रिया सुरू झाली. दोन हजारांच्या दोन नोटांच्या स्वरूपातच हे चार हजार मिळतात. आठ दिवसांपूर्वी हा निर्णय झाला; पण मागणीच्या तुलनेत चलनाचा पुरवठा कमी होत असल्याने आर्थिक मंदी निर्माण झाल्यासारखी स्थिती बाजारपेठेत निर्माण झाली आहे. 
जुन्या 500 व 1000च्या नोटा कोणीही स्वीकारत नाही. नवी 500 ची नोट अजूनही कोल्हापुरात पोचलेली नाही. 100 व त्याखालील किमतीच्या नोटांची चणचण आहे. अशा परिस्थितीत लोकांना दैनंदिन व्यवहार करणेही मुश्‍किल झाले आहे. पैशाचा प्रश्‍न सुटेपर्यंत बाजारातच जायचे नाही, असा निर्णय घेतल्याने बाजारातील उलाढाल 10 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आहे. त्याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. हॉटेल्स, बार, मोठी कापड दुकाने, मॉल्स, धान्य व्यापार, बाजार समितीसह लोकांना दैनंदिन लागणाऱ्या गरजा पुरवणाऱ्या दुकानांतही मालक, कामगारांशिवाय कोणी दिसत नाही. 
शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात बाजार समितीत येतो; पण त्या ठिकाणीही त्यांना जुन्या नोटा देऊन हा माल खरेदी केला जात आहे. जुन्या नोटा स्वीकारायला शेतकऱ्यांचा विरोध, तर नव्या नोटा नसल्याचे कारण सांगून माल न घेण्याची व्यापाऱ्यांची धमकी असे प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यातून कवडीमोल दराने शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. चलन तुटवड्याचा हा प्रश्‍न अजून किती दिवस? असाच प्रश्‍न लोकांच्या चेहऱ्यावर पडलेला पाहायला मिळत आहे. 

कर वसुलीही झाली ठप्प 
शासनाने महापालिकेसह शासनाचे विविध कर भरण्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्यास 14 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत संपल्याने करवसुलीवरही मोठा परिणाम जाणवू लागला आहे. पेट्रोल पंप वगळता जुन्या नोटा कुठेही घेतल्या जात नाहीत, ही मुदतही 18 नोव्हेंबरपर्यंतच आहे, त्यानंतर करायचे काय? या विवंचनेत लोक आहेत. 

Web Title: Eighth day economic turnover jam