... अन् पूरग्रस्त वृद्धा शर्मिला ठाकरेंच्या गळ्यात पडून रडली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

पुरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचा विश्वास शर्मिला ठाकरे यांनी पूरग्रस्तांना दिला.

कऱ्हाड ः तुम्ही आलात बर झाल, कोयनेच्या पुराच आमचा सार संसार वाहून गेलाय... काय करायचे कळना अस म्हणत येथील पाटण कॉलनीतील पुरग्रस्त वृद्द महिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शर्मिला राज ठाकरे यांच्या गळ्यात पडून रडू लागली. त्या महिलेच्या आश्रू पाहून ठाकरेही सदगतीत झाल्या.
ठाकरे यांनी आज (बुधवार) कऱ्हाड शहरातील पुरग्रस्त स्थितीची पहाणी केली. त्यांच्यासोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई व मुबईच्या काही नगरसेविका होत्या. सातारा जिल्हाध्यक्ष विकास पवार, शहराध्यक्ष सागर बर्गे, दादा शिंगण उपस्थित होते. त्यांनी पुरात मोठे नुकसान झालेल्या पाटण कॉलनी येथील झोपडपट्टीत फिरून माहिती घेतली. पुरग्रस्त महिला व नागरीकांशी संवाद साधला. अनेक घरात जावून थेट माहितीही घेतली. पडलेल्य़ा भिंती, कोसळलेल्या घरांचीही त्यांनी पहाणी केली. ठाकरे यांनी महिलांशी संवाद साधला त्यावेळी अनेक महिलांच्या डोळ्याचा कडा ओलावल्या होत्या. एक वृद्ध महिला तर त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली. नुकसान झालेल्या पुरग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचा विश्वास ठाकरे यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elderly women started to cry while meeting with Sharmila Thackreay