सांगली जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींची निवडणूक 

vote
vote

सांगली - निवडणूक आयोगाने आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका जाहीर केल्या. राज्यातील 25 जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायतींसाठी एकाच वेळी निवडणूक होत असून, यामध्ये सांगली जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला. 27 मे 2018 ला मतमोजणी होणार असल्याचेही जाहिर करण्यात आले आहे.  

सांगली जिल्ह्यातील 82 गावे.
मिरज- 3, कवठेमहांकाळ- 19, शिराळा -27, पलुस- 2, कडेगाव- 2, खानापूर(विटा)- 4, आटपाडी- 20 व जत- 5 अशा तालुकानिहाय ग्रामपंचायती आहेत. 
25 जिल्ह्यांतील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींतील 4 हजार 771 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली. 

निवडणूक जाहीर झालेली जिल्ह्यातील गावे 
मिरज - कावजी खोतवाडी, निलजी बामणी व वाजेगाव. कवठेमहांकाळ - बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, अग्रण धुळगाव, घोरपडी, करोली (टी), कोकळे, शिंदेवाडी, ढोलेवाडी, घोगांव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. जत - गुलगुंजनाळ, कोंत्येवबोबलाद, कोणबगी, बिळुर, खिलारवाडी. खानापूर - देवनगर, भेंडवडे, राजधानी भेंडवडे, साळशिंगे. आटपाडी - नेलकरंजी, वाक्षेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खूर्द, आंबेवाडी, खाजोडवाडी, आटपाडी, बनपूरी, भिंगेवाडी, करगणी, मापटेमळा, गुंडेवाडी, निंबवडे, पुजारवाडी, विभूतवाडी, औटेवाडी, कानकारेवाडी. पलुस - आमणापूर व विठ्ठलवाडी. कडेगाव - वाजेगाव, चिंचणी. शिराळा - वाकुर्डे बु., भाटशिरगाव, धसवाडी, खुजगाव, मादळगाव, रांजणवाडी, रिळे, शिरसी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंगरूळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणे, मोरेवाडी, पं. तं. वारूण, पाचगणी, मानेवाडी. 

नऊ सरपंच, 72 जागांसाठी पोटनिवडणूक 
जिल्ह्यातील 9 गावातील सरपंच पदासाठी व 72 सदस्यांच्या जागासाठी पोटनिवडणूका होत आहेत. 40 गावांतया पोटनिवडणूक आहे. मिरज- 9 सदस्य, 2 सरपंच, तासगाव- 6 सदस्य, जत- 24 सदस्य 1 सरपंच, आटपाडी- 3 सदस्य, खानापूर(विटा)8 सदस्य, कडेगाव- 4 सदस्य 1 सरपंच, पलुस- 4 सदस्य, 1 सरपंच, वाळवा- 7 सदस्य, 3 सरपंच, शिराळा- 8 सदस्य व 1 सरपंच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com