आणि पहिल्यांदाच बापटांचा अंदाज चुकला ! |Election results 2019

Assumptions of girish Bapat proven wrong this time
Assumptions of girish Bapat proven wrong this time

पुणे : पुण्याच्या कसबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक २८००० मतांनी निवडून आल्या आहेत. निकालाच्या दिवशी याच मतदारसंघातून यापूर्वी तीन वेळा आमदार झालेले आणि नुकतेच खासदार झालेले गिरीश बापट यांनी मताधिक्याबद्दल अंदाज वर्तवला होता. त्यात त्यांनी त्यांच्या कार्यालयातल्या फलकावर ५०००० चा एकदा लिहून तेवढे मताधिक्य मिळेल असे भाकीत केले होते. मात्र त्यांचे हे भाकीत चुकीचे ठरले आहे. 

गिरीश बापट यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक निवडणुकीनंतर ते असा अंदाज स्वाक्षरीसह लिहून ठेवतात.  आणि तो अंदाज दरवेळी अचूक असतो. यंदा मात्र बापटांचा अंदाज साफ चुकला असे म्हणता येईल. 

गिरीश बापट गेले २५ वर्षे या मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते कसब्यातून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्यानंतर पुण्याच्या महापूर मुक्त टिळक याना उमेदवारी देण्यात आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com