सांगोला : शेकापच्या बालेकिल्ल्यावर भगवा फडकला : Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

Election Result 2019 : शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांनी आमदार गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुखांचा अवघ्या 674 मतांनी धक्कादायक पराभव केला आहे.

पंढरपूर: शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा प्रथमच भगवा फडकला आहे. शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांनी अवघ्या 674 मतांनी पराभव केला.

- धक्कादायक ! युतीच्या पाच विद्यमान मंत्र्यांचा पराभव | Election Results

येथील मतदार संघावर शेकापचे जेष्ठनेते आमदार गणपतराव देशमुखांचे गेली 50 वर्षे एक हाती वर्चस्व होते. 1995 सालचा अपवाद वगळता 1972 पासून ते सलग 11 वेळा निवडून येण्याचा त्यांनी विक्रम नोंदवला होता. वयोमानामुळे आमदार गणपतराव देशमुखांनी यावेळी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शेकापने भाऊसाहेब रूपनवरांना उमेदवारी जाहीर केली होती.

- शरद पवार म्हणतात, 'शिवसेनेसोबत जाणार नाही' |Vidhan Sabha 2019 Result 

दरम्यान, ऐनवेळी रूपनवरांऐवजी गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुखांना उमेदवारी देण्यात आली. नाराज रूपनवरांनी  सेनेत प्रवेश केला, तर राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही सेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांना पाठिंबा दिला होता. अखेर अटीतटीच्या लढतीमध्ये सेनेच्या शहाजी बापू पाटील यांनी शेकापच्या गडावर भगवा फडकवला आहे.

- परळी : विजयानंतर धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results 2019 Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Solapur trends afternoon