esakal | सोलापूर: आमदार प्रणिती शिंदेंची 'हॅटट्रीक' | Election Results 2019
sakal

बोलून बातमी शोधा

praniti shinde wins in solapur shahar madhya vidhansabha election

Election Results 2019 : फेरीगणिक निकालाचे चित्र बदलणाऱ्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवत "हॅटट्रीक' केली.

सोलापूर: आमदार प्रणिती शिंदेंची 'हॅटट्रीक' | Election Results 2019

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : फेरीगणिक निकालाचे चित्र बदलणाऱ्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवत "हॅटट्रीक' केली. एमआयएमचे फारूक शाब्दी यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवत गत निवडणुकीतील पक्षाचे स्थान कायम राखले, तर अपक्ष महेश कोठे यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. शिवसेनेचे दिलीप माने यांना चौथ्या, तर माकपचे नरसय्या आडम यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

या मतदारसंघात 20 उमेदवार रिंगणात होते. पहिल्या फेरीत शिंदे आघाडीवर होत्या. त्यानंतर दुसऱ्या ते पाचव्या फेरीपर्यंत श्री. शाब्दी यांनी जोरदार मुसंडी मारत आघाडी कायम ठेवली. सहाव्या फेरीपासून अपक्ष श्री. कोठे यांनी आघाडी घेतली ती दहाव्या फेरीपर्यंत कायम होती. अकराव्या फेरीला शिंदे यांनी 1644 ची आघाडी घेतली, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक फेरीमध्ये त्यांना सरासरी दोन ते अडीच हजारांचे मताधिक्‍य मिळत गेले. 21 व्या फेरीपर्यंत हे मतदाधिक्‍क्‍य 11943 पर्यंत पोचले. 

लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर मुलीच्या विजयासाठी शिंदे यांनी कंबर कसली होती. तर प्रणिति शिंदे यांनी मतदारांना भावनिक आवाहनही केले होते. त्यांच्या या दमदार विजयानंतर कांग्रेस आणि इतर कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात पंचरंगी लढत पाहायला मिळली. पाचही उमेदवारांनी प्रचंड चुरस निर्माण केली आणि विजय कोणाचा होईल याचा अंदाज लावणे जवळपास कठीण होते.

प्रणिती शिंदे यांची महिला आणि तरुणांवर्गामध्ये पसंती आहे. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे, पण त्यांच्यासाठी यंदाची निवडणूक नक्कीच सोपी नव्हती. त्याचं मुख्य कारण म्हणजे देशात गेल्या पाच वर्षात कमकुवत झाली आणि त्याचा परिणाम राज्यपातळीवरही झाला. याचकाळात त्यांचे एकेकाळचे सहकारी सहकारी दिलीप माने आणि महेश कोठे त्यांच्याविरोधात उभे राहिले. हे एका प्रकारचं प्रणिती यांच्यासमोरचं आव्हानच होते.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ उमेदवारनिहाय मिळालेली मते : 

प्रणिती शिंदे : कॉंग्रेस (48,832),

फारूक शाब्दी : एमआयएम (36,889),

महेश कोठे : अपक्ष (29,526)

दिलीप माने : शिवसेना (27,340) 

नरसय्या आडम : माकप (10,128)

राहूल सर्वगोड : बसप (685) 

विजय आबुटे : बहुजन विकास आघाडी (375)

इम्तियाज पीरजादे : वंचित बहूजन आघाडी (2531)

खतीब वकील : आप (212) 

गौस कुरेशी : हिंदुस्थान जनता पार्टी (392)

सर्व अपक्ष - अशोक माचन (317), उमेश करपेकर (145), कल्याणी हलसंगी (359), दीपक गवळी (404), नागमणी जक्कन (195), बशीर शेख (442), मनीष गायकवाड (331), राजेंद्र रंगरेज (222), ऍड. विक्रम कबसे (98), सचिन मस्के (266) 

752 जणांनी वापरला नकाराधिकार 
या मतदारसंघात तब्बल 752 जणांनी 'नोटा-नकाराधिकार'चा वापर केला. पैकी 745 इव्हीएमवर तर सात पोस्टल मतद्वारे नकाराधिकार नोटा मते मोंदवली.