थोरात कारखान्याची निवडणूक बिनविरोध,मात्र, अर्ज माघारीवरून आरोप 

थोरात कारखान्याची निवडणूक बिनविरोध,मात्र, अर्ज माघारीवरून आरोप 

संगमनेर ः सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे कारखान्यावर पुन्हा एकदा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व सिद्ध झाले.

 
थोरात कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 2020 ते 25साठी निवडणुकीच्या अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी शेतकरी विकास मंडळाच्या सर्व विरोधकांनी माघार घेतली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे यांनी घोषित केले.

कारखान्याच्या 22 हजार 500 सभासदांमधून संचालकपदाच्या 21 जागांसाठी 382 जणांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, नव्या-जुन्यांचा मेळ घालत शेतकरी विकास मंडळाने दिलेल्या उमेदवारांसाठी इतरांनी माघार घेत, संगमनेरच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा कायम ठेवली. 

नवीन संचालक मंडळ असे : सोसायटी मतदारसंघ- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, इंद्रजित थोरात, इंद्रजित खेमनर, मीनानाथ वर्पे, बाबा ओहोळ, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, संपतराव गोडगे पाटील, दादासाहेब कुटे, रोहिदास पवार, रमेश गुंजाळ, विनोद हासे, अनिल काळे, चंद्रकांत कडलग, संतोष हासे, भास्कर आरोटे. भटक्‍या-विमुक्त जाती-जमाती- गणपतराव सांगळे, अनुसूचित जाती-जमाती- माणिक यादव, इतर मागासवर्गीय- अभिजित ढोले. महिला राखीव- मीरा वर्पे व मंदा वाघ. 

विरोधी गटातील विखे समर्थक जयश्री गणपत शिंदे यांचा अर्ज शेवटपर्यंत बाकी होता. इंद्रजित थोरात, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष बाबा ओहोळ, आर. एम. कातोरे, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी विरोधी गटाचे नेते ऍड. भास्कर दिघे, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शरद थोरात, संतोष रोहोम, सचिन शिंदे, गणपत शिंदे यांच्याशी चर्चा केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com