बापरे! इलेक्‍ट्रिक दुचाकीने घेतला अचानक पेट (व्हिडिओ) 

बापरे! इलेक्‍ट्रिक दुचाकीने घेतला अचानक पेट (व्हिडिओ) 

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील शेलगावहून करमाळ्याला जात असताना बाळनाथ वीर यांच्या इलेक्‍ट्रिक मोटारसायकलने अचानक पेट घेतला. या आगीत संपूर्ण मोटारसायकल जळून खाक झाली असून, फक्त सांगाडाच शिल्लक राहिला आहे.

सुदैवाने यात वीर यांना कोणतीही इजा झाली नाही. सोमवारी ही घटना शेलगाव (क) पासून करमाळा रस्त्यावर एक किलोमीटरवरील माने वस्तीजवळ घडली आहे. या घटनेमुळे इलेक्‍ट्रिक वाहन चालवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 


वीर यांनी करमाळा येथून 2018 मध्ये इलेक्‍ट्रिक मोटारसायकल खरेदी केली होती. मोटारसायकलच्या बॅटरीची समस्या असल्यामुळे त्यांनी नुकतीच म्हणजे 29 सप्टेंबर 2019 ला 24 हजार 500 रुपये किमतीची नवी बॅटरी बसवली होती. वीर हे कामानिमित्त करमाळ्याला जात असताना अचानक गाडी बंद पडली म्हणून ते खाली उतरले. तोपर्यंत गाडीने पेट घेतला. गाडीने पेट घेताच मोठ्या संख्येने लोकांनी या परिसरात गर्दी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com