'नवप्रकाश'मधून तीन कोटींची वसुली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

सोलापूर - कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने सुरू केलेल्या "नवप्रकाश' योजनेस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील आठ हजार 58 ग्राहकांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी थकबाकी भरल्यामुळे महावितरणला तीन कोटी 26 लाख 20 हजार रुपये मिळाले आहेत.

31 मार्च 2016 पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या उच्च व लघुदाब वीज ग्राहकांसाठी महावितरणने 1 नोव्हेंबरपासून "नवप्रकाश' योजना सुरू केली आहे. या योजनेत आतापर्यंत बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्‍यांतील दोन हजार 237 वीज ग्राहकांनी एक कोटी 34 लाख 79 हजार रुपये, सातारा मंडलातील तीन हजार 217 वीज ग्राहकांनी 56 लाख 76 हजार रुपये भरले आहेत. या दोन्ही मंडळांच्या तुलनेने सोलापूर मंडळातील जास्त ग्राहकांनी याचा फायदा घेत थकबाकी भरली आहे. त्या ग्राहकांना या योजनेनुसार व्याज, तसेच विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे.

"नवप्रकाश' योजनेत 31 जानेवारी 2017 पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ करण्यात येईल. तसेच 1 फेब्रुवारी 2017 ते 30 एप्रिल 2017 पर्यंत मूळ थकबाकीसोबत 25 टक्के व्याजाच्या रकमेचा भरणा करावा लागणार आहे. उर्वरित 75 टक्के व्याज व 100 टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळावर संबंधित ग्राहकांच्या थकीत देयकाचा तपशील व "नवप्रकाश' योजनेत किती रक्कम भरायची, याबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: electricity arrears recovery in navprakash scheme