वीजबिल थकबाकी : आटपाडीत साडेआठ कोटींची वसुली

Electricity bill arrears: Recovery of Rs 8.50 crores
Electricity bill arrears: Recovery of Rs 8.50 crores

आटपाडी (जि. सांगली) : आटपाडी तालुक्‍यात उपविभागीय महावितरण कार्यालयाने मार्चअखेर 8 कोटी 67 लाख थकित वीज बिलाची वसुली केली. यामध्ये सर्वाधिक घरगुती कनेक्‍शन धारकाकडून 3 कोटी 6 लाख रुपये वसूल केले; तर ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या गावठाणातील वीज बिलाची एक रुपयाही वसुली झाली नाही. 


गेल्या वर्षी 22 मार्चला लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर वीजबिल भरण्यासाठी साऱ्यांचाच प्रतिसाद थंडावला. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरोना कालावधीतील वीजबिल माफीची घोषणा केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महावितरण कार्यालयाने वसुलीची मोहीम सुरू केली.

अचानक सर्व थकबाकी भरणे शक्‍य नसल्यामुळे हप्ते पाडून दिले; तर शेती ग्राहकासाठी सवलत योजना जाहीर केली. आटपाडी महावितरण कार्यालयाचे शाखा अभियंता संजय बालटे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे फंडे वापरून वसुली चालू केली. वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा यथोचित सन्मान करून सत्कारही केला गेला. त्यामुळेच आटपाडी तालुक्‍यात महावितरण कार्यालयाने मार्च अखेर 8 कोटी 67 लाख वीज बिलाची थकबाकी वसुली झाली. 


यामध्ये घरगुती ग्राहकांची 4 कोटी 38 लाख थकबाकी पैकी तीन कोटी सहा लाख ग्राहकांनी भरले. व्यावसायिक ग्राहकांची एक कोटी 63 लाख थकबाकी पैकी एक कोटी 45 लाख जमा झाली आहे. औद्योगिक ग्राहकांची एक कोटी पाच लाख थकबाकी होती. त्यातील मार्चअखेर 92 लाख जमा केले. तसेच पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या योजनांची थकबाकी तीन कोटी 47 लाख पैकी 29 लाख जमा झालेत. 


शेतकऱ्यांची सवलत योजनेकडे पाठ 
आटपाडी तालुक्‍यात शेती ग्राहकांची 72 कोटी 22 लाख एकूण थकबाकी आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या सवलत योजनेतून थकबाकी भरल्यास 31 कोटी 11 लाख भरणे आवश्‍यक आहे. शासनाने सवलत जाहीर करूनही याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मार्चअखेर 2 कोटी 86 लाख इतकीच वसुली झाली आहे. 


गावठाणची वसुलीचा दमडाही नाही. 
आटपाडी तालुक्‍यातील सात गावांत गावठाण अंतर्गत वीज पुरवठा केला जातो. त्याची थकबाकी 3 कोटींवर आहे. यातील एकाही ग्रामपंचायतीने एकही रुपया मार्चअखेर जमा केलेला नाही. 

कसलाही दबावतंत्राचा वापर न करता वसुली
शासनांच्या सूचनेनुसार आम्ही सर्वांनी थकबाकीसाठी समझोत्याने प्रयत्न केले. कसलाही दबावतंत्राचा वापर न करता मार्च अखेर आठ कोटी 67 लाख रुपये थकबाकी वसुली झाली. यामध्ये सर्व कनिष्ठ अभियंता आणि कर्मचाऱ्यांचे योगदान राहिले. 
- संजय बालटे, शाखा अभियंता, उपविभागीय महावितरण कार्यालय, आटपाडी 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com