वीजबिले वेळेत भरता येणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - राज्यातील अडीच कोटी वीज ग्राहकांना वीज बिल वेळेत मिळणार आहे. त्यासाठी महावितरण कंपनीने वीज बिलांची छपाई ते वितरण सेवा केंद्रीय पद्धतीने सुरू केली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना वीज बिले वेळेवर भरता येणार आहेत.

कोल्हापूर - राज्यातील अडीच कोटी वीज ग्राहकांना वीज बिल वेळेत मिळणार आहे. त्यासाठी महावितरण कंपनीने वीज बिलांची छपाई ते वितरण सेवा केंद्रीय पद्धतीने सुरू केली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना वीज बिले वेळेवर भरता येणार आहेत. त्यातून वेळेपूर्वी वीज बिल भरल्यास सवलतींचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीय स्तरावर वीज बिल वितरणाची प्रक्रिया सुरू करणारी देशातील महावितरण कंपनी एकमेव आहे, असा दावाही केला. 

महावितरणला सध्या वीज बिल छपाई ते वितरणासाठी ७ ते ८ दिवस लागतात. त्यामुळे ग्राहकाला बिले उशिरा मिळतात. तेव्हा वीज बिल भरण्यास ग्राहकांकडून उशिर होतो. त्यामुळे वीज ग्राहकाला सवलतींचा लाभ मिळत नाही. तसेच वीज बिल छपाई व वितरण वेगवेगळ्या एजन्सी करतात. त्यावर नियंत्रण ठेवणे महावितरणला अशक्‍य आहे.  

या अडचणींवर मात करून वीज बिल वेळीच देण्यासाठी महावितरणने केंद्रीय पध्दत अवलंबली आहे. त्यानुसार मोबाईल ॲपवर मीटर रिडींग (रियल टाईम) वेळेवर होईल ते थेट महावितरणच्या सर्व्हरला जोडले जाईल, तिथे त्याचे रिडींग चेक होईल. ही सर्व प्रक्रिया जलद होईल. यातून अचूक बिल मिळेल. ते बिल भरण्यासाठी वीज ग्राहकांना पुरेसा कालावधी मिळेल. त्यासाठी मुख्यालयातील सर्व्हरवर अंतिम बिल तयार होईल. तयार बिले प्रत्येक परिमंडल स्तरावर वीज बिल वितरणासाठी नियुक्ती करण्यात येणाऱ्या एजन्सीकडे २४ तासांच्या आत पाठविण्यात येतील. ती संबंधित एजन्सी पुढे २४ तासांत शहरी भागात वीज ग्राहकांना वीज बिल वितरित करेल. तर ग्रामीण भागात वीज बिले ७२ तासांत वितरित होतील. 

...तर एजन्सीला दंड
वीज बिल वेळीच ग्राहकांपर्यंत न पोचल्यास संबंबित एजन्सीला दंड होणार आहे. त्यामुळे वीज बिल वेळेत ग्राहकांना मिळतील. बिल भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. वीज बिल भरता येईल. त्यातून सवलतीचा लाभ ग्राहकाला मिळणार आहे.

Web Title: Electricity bill can be filled in time