लॉकडाऊन काळात उद्योजकांना लाखोंची वीज बिले;  उद्योजक संतप्त

eletricity.jpg
eletricity.jpg

कुपवाड : लॉकडाऊन काळामध्ये औद्योगिक क्षेत्रातील उद्योग-व्यवसाय बंद अवस्थेत असताना महावितरण कंपनीकडून उद्योजकांना लाखो रुपयांची बिले प्राप्त झाल्याने उद्योजकांनी संताप व्यक्त केला. तसेच प्राप्त झालेली वाढीव बिले तातडीने रद्द करावीत, अशी मागणी शासनाकडे केली. 


"कोरोना' नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 21 मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच उद्योग बंद अवस्थेत होते. उद्योगाचे चक्र थांबले असताना महावितरण कंपनीने एप्रिल महिन्यातील वीज बिलामध्ये चौपट वाढ केली. झालेल्या वाढी नुसार उद्योजकांना लाखों रुपयांची वीजबिले प्राप्त झाली. या अनागोंदी कारभारामुळे उद्योग-व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे उद्योजकांनी रविवारी घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केले. 


सतीश मालू म्हणाले,""एप्रिल महिन्यापासून झालेल्या लॉक डाऊनमुळे उद्योग बंद अवस्थेत होते. त्यामुळे पॉवर फॅक्‍टर मेन्टेन होणे शक्‍य झाले नाही. के.व्ही.ए.एच बिलिंग हे पॉवर फॅक्‍टरवर अवलंबून असते. अशात उद्योग बंद असताना उद्योजकांना वीजबिले कित्येक पटीने अधिक प्राप्त झाली. शासनाने ही बिले रद्द करावीत. के.डब्ल्यू.एच बिलिंग प्रमाणे तीन महिन्यांची बिले देण्यात यावीत. तसेच लॉक डाऊन काळातील स्थिर आकार पूर्णपणे रद्द करावा तरच उद्योग टिकणे शक्‍य आहे. 


शिवाजी पाटील म्हणाले,""देशातील तसेच परदेशातील बाजारपेठा बंद आहेत. उत्पादित माल उठाव नसल्याने पडून आहे. कुशल मनुष्यबळ नाही. अनेक समस्यांनी उद्योजक हैराण आहेत. अशा संकटांत शासनाने उद्योगांना मदत करण्याऐवजी विजेची वाढीव बिले प्राप्त झाल्याने उद्योजक हतबल आहेत. शासनाने वाढीव बिले तातडीने रद्द करावीत. 
अनेक राज्यांनी लॉकडाऊन कालावधीतील स्थिर आकार रद्द केला आहे. परंतु राज्य सरकारने स्थिर आकार रद्द ऐवजी स्थगिती दिली आहे. जून महिन्यानंतर या स्थिर आकाराची वसुली होणार असल्याने ती उद्योजकांना परवडणारी नाही. यासाठी स्थिर आकार रद्द करावा.'' 


यावेळी संजय अराण्णके, किरण तारळेकर, सचिन पाटील यांच्यासह जिल्हाभरातील औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com