महावितरणच्या कोल्हापूर, सांगली परिमंडलात वीज बिल थकबाकी १११४ कोटी !

महावितरणच्या कोल्हापूर, सांगली परिमंडलात वीज बिल थकबाकी १११४ कोटी !

कोल्हापूर - महावितरणच्या कोल्हापूर व सांगली परिमंडलातील (सर्कल) वीज बिल थकबाकी दरवर्षी वाढत असून, हा आकडा आता १११४ कोटी ३५ लाख ४६ हजारांवर पोचला आहे. शेतकरी वर्गाची थकबाकी सुमारे ८९१ कोटी २ लाख ७७ हजार इतकी झाली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी विजेचा वापर आवश्‍यक असताना या विभागाची थकबाकी मात्र १० कोटी ४२ लाख ३६ हजार रुपये दिसत आहे. विशेष म्हणजे, सांगली सर्कलची थकबाकी ७७९ कोटी ५६ लाख ५ हजार, तर कोल्हापूर सर्कलची ३३४ कोटी ७६ लाख ४१ हजार इतकी आहे.

महावितरणतर्फे बीपीएल, रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, पॉवरलूम, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट, ॲग्रीकल्चर, पब्लिक सर्व्हिसेस व इतर घटकांसाठी वीजपुरवठा केला जातो. बिलाची थकबाकी राहिली, तर महावितरणचे कर्मचारी वसुलीसाठी येतात. ग्राहकांनी बिल वेळेत भरावे, यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करतात. प्रसंगी त्यांना वीज कनेक्‍शन तोडावेही लागते. सवडीनुसार वीज बिल भरण्याची मानसिकता ग्राहकांत असल्याने थकबाकीचा डोंगर वाढताना दिसतो आहे. गेल्या काही वर्षांत थकबाकीचा आकडा वाढत असल्याचे महावितरणमधील सूत्रांनी सांगितले. 

शेतमालाला हव्या त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून वीज बिल भरण्याचे प्रमाणही कमी असल्याचे कारण सांगण्यात येते. कोल्हापूर व सांगली सर्कलमध्ये एकूण ३७ लाख ६७५ शेतकरी ग्राहक असून, त्यापैकी ३८ हजार २०१ शेतकरी ग्राहक वीज बिल भरत असल्याची माहिती पुढे आली आहे. औद्योगिक सेक्‍टरमधील बिल थकीत राहिल्यास ते व्याजासह भरावे लागते. ही प्रक्रिया तीन टप्प्यातील आहे. त्यामुळे वीज बिले थकीत ठेवणे औद्योगिक सेक्‍टरसाठी धोक्‍याचे ठरते. त्यामुळे या सेक्‍टरमधून वीज बिल वेळीच भरले जाते, असे चित्र आहे. 

थकबाकी अशी : 
 कोल्हापूर सर्कल आणि सांगली सर्कल
- रेसिडेन्शियल*१८ कोटी ७४ लाख ९१ हजार      *१७ कोटी ५१ लाख ८८ हजार
- कमर्शियल *७ कोटी २१ लाख ५४ हजार *          ६ कोटी १ लाख ३९ हजार
- इंडस्ट्रियल * ७ कोटी ९९ लाख ९९ हजार *      २ कोटी ४२ लाख ४६ हजार
- ॲग्रीकल्चर * २०९ कोटी ३२ लाख ४९ हजार*        ६८१ कोटी ७० लाख २८ हजार
- स्ट्रीट लाईट * ४७ कोटी ४९ लाख ५८ हजार*           ५८ कोटी ४५ लाख २६ हजार
- पाणीपुरवठा * ४२ कोटी ७७ लाख ४२ हजार *             १२ कोटी ८८ हजार
- पब्लिक सर्व्हिसेस * ७५ लाख ९० हजार*              ७६ लाख ६६ हजार
- इतर * ४६ लाख ६९ हजार *                            ६७ लाख २३ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com