प्रतियुनिट 2.44 रुपये दराने वीज पुरवठा करावा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - वाढीव वीज बिल व आर्थिक मंदीने अडचणीत असलेल्या यंत्रमाग व्यावसायिकांना शासनाने प्रतियुनिट सर्व करांसह 2.44 रुपये दराने वीज पुरवठा करावा, थकीत वीज बिलासाठी सवलत मिळावी या मागण्यांचे निवेदन माजी खासदार निवेदिता माने व सत्वशील माने यांनी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांना दिले.

यंत्रमाग व्यावसायिकांपुढे अनेक अडचणी असून, हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यात भर म्हणून वाढीव वीज बिलाने यंत्रमाग व्यावसायिकांच्या नाकीनऊ आले आहे. थकीत बिलापोटी वीज वितरण कंपनीकडून अन्यायी वीज तोडणी केल्यामुळे अनेक उद्योग बंद पडत आहेत. पैसे बुडवण्याची भूमिका कोणत्याही उद्योजकांची नाही, मात्र थकीत बिलही 2.44 रुपये प्रति युनिट दराने सर्व करांसह आकारावे. त्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
यंत्रमाग व्यावसायिकांच्या प्रश्‍नांबाबत विधान परिषदेत स्वतंत्र चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्‍वासन सभापती श्री. निंबाळकर यांनी दिले. याबाबत ऊर्जामंत्री बबनराव बावनकुळे यांच्याशी संबंधित घटकांची बैठकही घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Electricity charges should be Rs. 2.44 per unit