कोयना परिसर अंधारात; दूरध्वनी सेवाही ठप्प

विजय लाड
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

मुसळधार पावसाचे माहेरघर असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग आठवा दिवस मुसळधार पावसाचाच ठरला आहे.पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात ४  टीएमसीने वाढ झाली आहे.

कोयनानगर : मुसळधार पावसासाठी प्रतिचेरापुंजी असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. मुसळधार पावसात कोयना धरण परीसरात महानिर्मिती कंपनीने भारनियमनाचा 'भार' दिल्यामुळे कोयना धरणासह कोयना परीसर अंधारात गेला आहे. यातच भारत संचार निगमच्या अनागोंदी कारभारामुळे दूरध्वनी सेवा बंद झाल्यामुळे कोयना धरण व परिसर संपर्कहीन झाला आहे.

मुसळधार पावसाचे माहेरघर असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग आठवा दिवस मुसळधार पावसाचाच ठरला आहे.पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात ४  टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून  जलपातळी नियंत्रित करण्याचा दुसरा टप्पा चोवीस तासात होण्याची शक्यता आहे. कोयना धरणात ८४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मुसळधार पावसाने व भारत संचार निगमच्या अनागोंदी कारभारामुळे कोयना धरण परिसर चोवीस तास संपर्कहीन झाला आहे.त्यातच महानिर्मिती  कंपनीने कोयना धरण परीसरात भारनियमनचा ' भार ' देवून विज पुरवठा खंडित केला आहे.यामुळे कोयना धरण व कोयना परिसर अंधारात गेला आहे.

दूरध्वनी सेवा कोलमडल्यामुळे कोयना धरणाचे आपत्ती व्यवस्थापन कोलमडल्यामुळे कोयना प्रकल्पाने भारत संचार निगमवर कारवाई करावी अशी मागणी कोयना प्रकल्पाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. सकाळी 7 पर्यंत महाबळेश्वर 213 मिमी तर नवजा 155 मिमी पाऊस झाला आहे. पाण्याची आवक 64400 क्यूसेक आहे. एकूण पाणीसाठा 88 टीएमसी झाला आहे. धरणातून वक्रद्वारातून सांडव्यावरून आज दुपारी एक वाजता 15 ते 20 हजार क्यूसेक विसर्ग सोडण्याची श्यक्यता आहे. विसर्गात वाढ होऊ शकते.

- कुमार पाटील, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electricity downs due to heavy rains in Koyna