वीज कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

महावितरणने कंत्राटी कामगारांना न्याय न दिल्यास राज्यभर हे कामगार रस्त्यावर उतरून महावितरणच्या विरोधात आंदोलन करतील. महावितरणने न्याय न दिल्यास याविषयी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारीही संघटनेच्या वतीने केली आहे, अशी माहिती वीज कंत्राटी कामगार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजकुमार काळे यांनी दिली.

सोलापूर - महावितरणने कंत्राटी कामगारांना न्याय न दिल्यास राज्यभर हे कामगार रस्त्यावर उतरून महावितरणच्या विरोधात आंदोलन करतील. महावितरणने न्याय न दिल्यास याविषयी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारीही संघटनेच्या वतीने केली आहे, अशी माहिती वीज कंत्राटी कामगार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजकुमार काळे यांनी दिली.

महावितरणमध्ये गेल्या 10-15 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने अनेक कामगारांची नेमणूक केली आहे. वयाच्या अटीत बसत नसल्यामुळे या कामगारांना डावलून महावितरणने नव्याने सात हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे राज्यातील 15 हजार कंत्राटी कामगारांना न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने केली आहे.

कंत्राटी कामगारांच्या अनुभवाचा विचार न करता महावितरणने सरकारने निर्धारित केलेल्या वयाच्या विरोधात जाऊन अर्ज भरले जात आहेत. त्यामुळे गेल्या 10-15 वर्षांपासून नियमित कामगारांचे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्या पदावर सामावून घेण्याची मागणीही संघटनेने केली आहे. महावितरणने सुरू केलेल्या या भरतीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयात सूट मिळावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity Employee Agitation