महाबळेश्वरमध्ये वीजवाहिन्यांची दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

महाबळेश्वर - येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाने वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम ऐन मे महिन्यात हाती घेतले आहे. त्यामुळे दर मंगळवारी वीजपुरवठा दिवसभर खंडित होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

महाबळेश्वर - येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाने वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम ऐन मे महिन्यात हाती घेतले आहे. त्यामुळे दर मंगळवारी वीजपुरवठा दिवसभर खंडित होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

महाबळेश्वर येथील व्यापाऱ्यांना पावसाळ्यातील चार महिने व्यवस्थित जाण्यासाठी उन्हाळी हंगामात व्यस्त असतात. याचबरोबर वीज वितरण कंपनीही पुढील येणाऱ्या पावसाळ्यात येथील वीजपुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने खांबावरील वीज वाहिनी वाहून नेणाऱ्या लोखंडी अँगल बदलण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे दर मंगळवारी वीजपुरवठा बंद ठेवून काम करणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

पाचगणीपासून वेण्णालेकपर्यंत असणारी ३३ केव्हीची विद्युत वाहिनीच्या खांबावरील लोखंडी अँगल आता जीआय मटेरिअलमध्ये बदलण्यात येणार आहे. येथील थंड हवामान, जोरात कोसळणाऱ्या पावसामुळे येथे लोखंडी वस्तूंना नेहमीच गंज चढत असतो. लोखंडी खांबावरील अँगलही गंजामुळे तुटत असल्याने अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. तो भविष्यात खराब होऊ नये, म्हणून जीआय मटेरिअलमध्ये अँगल बदलण्याचे काम कंपनीने हाती घेतले आहे. वाई येथील एचव्हीजी इलेक्‍ट्रिकल कंपनी हे काम मे महिन्यात पूर्ण करणार आहे. त्यासाठी दर मंगळवारी वीजपुरवठा बंद करण्यात येणार असून, ग्राहकांची गैरसोय होणार आहे. अधीक्षक अभियंता संजय साळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता गणेश चांदणे, सहायक अभियंता एच. पी. शिंदे व कनिष्ठ अभियंता एस. एस. पाटील हे काम करीत आहेत.

अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा
येथील व्यावसायिकांसाठी उन्हाळी हंगामातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. या व्यवसायावरच पावसाळ्यातील अर्थकारण व उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यासाठी व्यापारी दोन महिन्यांपासून तयारीत असतात. परंतु, वीज वितरण कंपनीचे अधिकारी निष्काळजीपणाने वागताना दिसत आहेत. ही विद्युत खांबावरील लोखंडी अँगल बदलण्याचे काम जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणे आवश्‍यक आहे. वरिष्ठ अधिकारी महाबळेश्वरबाबत जागरूक आहेत. परंतु, येथील अधिकारी केवळ दिवस काढण्याचे काम करत आहेत. ऐन उन्हाळी हंगामात काम करून ग्राहकांना विनाकारण त्रास देण्याची येथील अधिकाऱ्यांची मानसिकता आहे, अशी नागरिकांत चर्चा आहे.

Web Title: electricity line repairing