वीज मीटर उपलब्ध नाही हो!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

कोल्हापूर - घरगुती वीज जोडणीसाठी महावितरणकडून वीज मीटर उपलब्ध होत नाहीत, असा अनुभव काही ग्राहकांना येत आहे. तर काही वेळा महावितरणच्या कार्यालयातील तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून परस्पर वीज मीटर नसल्याने जोडणी देण्यास विलंब होईल, असे अगोदरच सांगण्यात येते.

त्यातून वीजग्राहकांचा संभ्रम वाढत आहे. वीज मीटर पुरेशा संख्येने आहेत. एकदा स्टॉक संपल्यानंतर दुसरा स्टॉक येईपर्यंतच्या कालावधीत विलंब होऊ शकतो. मात्र, सरसकट मीटर सर्वत्र संपले आहेत असे नाही, अशी माहिती महावितरणच्या शहर अभियंत्यांकडून देण्यात आली. 

महावितरणच्या बहुतांश सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. यात वीजमीटर जोडणी घेण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आहे. तसेच जे ग्राहक ऑनलाईनचा वापर करीत नाहीत, त्यांना महावितरणच्या शाखेत योग्य कागदपत्रे देऊन वीजजोडणी घेता येते. कागदपत्रे घेऊन जाणाऱ्यांना शहरातील अनेक शाखांमध्ये वीजमीटर जोडणी देण्यासाठी विलंब होतो. यात अनेकदा मीटर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याचा अनुभव आहे. याबाबत फेब्रुवारीत ‘सकाळ’मधून आवाज उठविल्यानंतर वीज मीटर उपलब्ध झाले; मात्र गेल्या काही दिवसांपासून साने गुरुजी वसाहत आणि दुधाळी येथील शाखेतून वीज मीटर उपलब्ध होत नसल्याची माहिती भालचंद्र निरकारणे या वीज ग्राहकाकडून देण्यात आली. 

वीज मीटर घेण्यासाठी जागेचा नकाशा, प्राॅपर्टी कार्ड, आधार कार्ड, रहिवासी दाखला, ए वन, डी वन फॉर्म आदी कागदपत्रे दिल्यानंतर कंपनीचे वायरमन येऊन अंदाजित खर्च सांगतात. त्यानंतर अनामत रक्कम भरल्यानंतर वीज मीटरची जोडणी दिली जाते.

परस्परविरोधी दावे
पावसाळ्यामुळे काही वेळा वीजदुरुस्तीची कामे वाढली आहेत. याशिवाय वीज बिलांची वसुली, अशा कामांसोबत नवीन वीजजोडणी देण्याचे काम महावितरण कर्मचाऱ्यांना करावे लागते. यात एक-दोन दिवस विलंब होतो. अशा विलंब काळात महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांकडून वीज मीटर शिल्लक नाहीत, असे सरसकट उत्तर दिले जाते. तर महावितरणचे अभियंते, अधिकारी मात्र वीज मीटर शिल्लक असल्याचा दावा करतात. यातून वीजग्राहकांचा संभ्रम वाढतो आहे.

Web Title: electricity meter not available