चंदगडला सुगीच्या तोंडावर हत्तीचे आगमन

चंदगडला सुगीच्या तोंडावर हत्तीचे आगमन

चंदगड - ऐन सुगीच्या तोंडावर हत्तीचे आगमन झाले आहे. दोन दिवसापासून हा हत्ती वाघोत्रे (ता. चंदगड) परीसरात वावरत असून पिकांचे नुकसान करीत आहे. काही दिवसापूर्वी कर्नाटक सीमेवरील तुडये, कोलीक भागात आलेला हत्ती तळकोकणात उतरला होता. दोन दिवसापूर्वी पारगड मार्गावरील कणवी मंदिरानजीक त्याचे काहींना दर्शन झाले. काल या भागातील महादेव पवार यांची बैलगाडी हत्तीने उलटून टाकली. त्यांच्यासह रमेश शिंदे व राजाराम घुमे यांच्या भात व नाचणा पिकाचे नुकसान केले.

गेल्या काही वर्षापासून पावसाळा संपताच हत्ती या भागात प्रवेश करीत असल्याचा अनुभव आहे. मुबलक चारा, खासगी मालकीतील हिरवी पिके आणि डुंबण्यासाठी पाण्याचे प्रकल्प असल्यामुळे हत्ती या भागात येत असल्याचे सांगितले जाते. मात्र चार महिने कष्टाने पिकवलेल्या शेतीचे हत्तीकडून केले जाणारे नुकसान शेतकऱ्यांना परवडणारे नाही.

शासनाकडून दिली जाणारी पिकांची भरपाईसुध्दा अत्यंत तोकडी असल्याने या नुकसानीमुळे शेतकरी उध्वस्त होत आहेत. शासनाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा बाजारभावाप्रमाणे पिकांची नुकसान भरपाई द्यावी ही शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी प्रलंबित आहे. दरम्यान वन विभागाकडून हत्तीच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येत असून नागरीकांनीही खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com