बाजरीमुळे अकरा जणांना विषबाधा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

नगर तालुका : देहरे येथे आज दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास भिल्ल वस्ती येथे राहणाऱ्या पवार, वाघ व माळी कुटुंबांतील 11 व्यक्‍तींना बाजरीमुळे विषबाधा झाली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

नगर तालुका : देहरे येथे आज दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास भिल्ल वस्ती येथे राहणाऱ्या पवार, वाघ व माळी कुटुंबांतील 11 व्यक्‍तींना बाजरीमुळे विषबाधा झाली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

याबाबत समजलेली माहिती अशी ः देहरे (ता. नगर) येथील पवार यांच्या घरी दोन-तीन दिवसांनी लग्नाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी त्यांच्याकडे मदत करण्यासाठी माळी व वाघ कुटुंब पाहुणे म्हणून आले आहे. शुक्रवारी सकाळी सर्वांनी बाजरीची भाकरी बटाट्याच्या भाजीसह खाल्ली. 

 

vishbadha

जेवणानंतर त्यांना मळमळ, चक्‍कर, उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे ते सर्व तातडीने देहरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. प्राथमिक उपचार करून केडगाव व राहुरी येथील "108' रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. 

केडगावमधून डॉ. सुभाष बागले, तर राहुरीवरून डॉ. रमेश रणसिंग आले. त्यांनी तातडीने रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयात डॉ. बापूसाहेब गाडे, डॉ. संदीप सांगळे यांनी सर्व रुग्णांची तपासणी केली. 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील, पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले यांनी रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. 
 
यांना झाली विषबाधा 
धीरज रमेश पवार (वय 7) हा अत्यवस्थ असून, त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. ललिता अतुल वाघ (वय 25), जनाबाई शंकर माळी (वय 75), सुनीता राहुल माळी (वय 26), सुदर्शन अतुल वाघ (वय 11), क्षितिज रमेश पवार (वय 7), सूरज रोहिदास पवार (वय 31), कार्तिक सूरज पवार (वय 2), मोनाली रमेश माळी (वय 15), राहुल रमेश माळी (वय 25), पूजा भास्कर वाघ (वय 21) यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eleven people poisoned in nagar