अकरावीला आरक्षणानुसार प्रवेश

Mission-Admission
Mission-Admission

सातारा - अकरावी प्रवेशासाठी यंदा खुल्या प्रवर्गातील आठ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या आरक्षणात (इडब्लूएस) दहा टक्के तसेच एसईबीसी (मराठा आरक्षण) या प्रवर्गास १६ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, कला-क्रीडाबाबतच्या आरक्षणाबाबत शिक्षण विभागाकडून दुजाभाव होत असल्याची
भावना पालकांसह विद्यार्थ्यांतून उमटू लागली आहे. 

सातारा शहरात अकरावी प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी विविध महाविद्यालयांतून सुमारे १२०० प्रवेश अर्जांची विक्री झाली आहे. यंदाही विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान व वाणिज्य शाखेकडे आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये इयत्ता दहावीची गुणपत्रिका शुक्रवारी (ता. २१) मिळाल्या.

माध्यमिक शिक्षण विभागाने शनिवारपासून (ता. २२) प्रवेश अर्ज विक्री करण्याच्या सूचना कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या. पहिल्या दिवशी शहरातील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, कला व वाणिज्य महाविद्यालय, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, कन्याशाळा व ज्युनिअर कॉलेज या व अन्य महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेश चौकशीसाठी तसेच प्रवेश अर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांची, पालकांची झुंबड उडाली होती. एका दिवसात सुमारे १२०० अर्जांची विक्री झाली. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने ycis.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

विद्यार्थ्यांना अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ती महाविद्यालयात जाऊन जमा करावी लागणार आहे.  

अकरावी प्रवेशासाठी यंदा खुल्या प्रवर्गातील ज्या कुटुंबाचे आठ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत उत्पन्न आहे, अशा विद्यार्थ्यांनी तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला प्रवेश अर्जासोबत जोडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल (इडब्लूएस) या प्रवर्गातून अर्ज भरल्यास दहा टक्के आरक्षणाचा लाभ होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com