‘विज्ञान’ला सर्वाधिक पसंती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

कोल्हापूर - अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या दिवशीही विज्ञान शाखेला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली. या शाखेसाठी चार हजार ५१७ इतक्‍या अर्जांची तर वाणिज्य शाखेसाठी दोन हजार ३२ इतक्‍या अर्जांची विक्री झाली.
प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविली जात आहे. कोणत्याही तीन महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रानधान्यक्रम द्यावा लागतो. 

संगणकाच्या आधारे प्रवेश निश्‍चित केले जातात. अर्ज वितरण केंद्रावर दुसऱ्या दिवशीही गर्दी दिसून आली. विद्यार्थ्यानी काळजीपुर्वक अर्ज भरून संकलन केंद्रात दाखल केले. विज्ञान, वाणिज्य आमि कला शाखेसाठी वेगवेगळ्या रंगाचे प्रवेश अर्ज आहेत. विज्ञान शाखेसाठी चार हजार ५१७, वाणिज्य मराठी शाखेसाठी दोन हजार ३२, इंग्रजी शाखेसाठी १५४०, कला मराठी शाखेसाठी ११७८, इंग्रजी शाखेसाठी १७ अशा नऊ हजार ३०४ इतक्‍या अर्जांची विक्री झाली. दोन दिवसात दहा हजार ९०८ इतक्‍या अर्जांची विक्री झाली आहे. संकलित अर्जांची २२०४ इतकी आहे. आज शाहू जयंतीची स्थानिक सुट्टी असूनही अर्ज विक्री सुरू राहिली.

Web Title: eleventh admission Science site admission education