अकरावी प्रवेशासाठी उद्यापासून प्रशिक्षण वर्ग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत येत्या २५ मेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज कसा भरावा, आरक्षणासाठी कोणती कागदपत्रे दाखल करावीत, ॲप्रुव्हल कसे मिळणार आदी गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी २२ आणि २३ मे रोजी विविध ठिकाणी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केल्याची माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे.

सातारा - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत येत्या २५ मेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज कसा भरावा, आरक्षणासाठी कोणती कागदपत्रे दाखल करावीत, ॲप्रुव्हल कसे मिळणार आदी गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी २२ आणि २३ मे रोजी विविध ठिकाणी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केल्याची माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे. 

दहावीचा निकाल साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागतो. त्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये प्रवेशाला प्रारंभ होतो. इयत्ता अकरावीत गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो. ही प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाइनच्या माध्यमातून होते. या प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती व्हावी, यासाठी केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीद्वारे शहरातील विविध भागांमध्ये मार्गदर्शन वर्गांचे आयोजन केले आहे. या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकेतील प्रवेश अर्जाचे भाग एक आणि दोन कसे भरावे, आरक्षणासाठी कोणती कागदपत्रे दाखल करावीत, ॲप्रुव्हल कसे मिळणार, अशा अनेक मुद्द्यांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.

प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश फेऱ्यांच्या याद्यांनुसार विविध महाविद्यालयांच्या प्रवेशाचे कट ऑफ गुण कळतील आणि त्याआधारेच त्यांना अकरावीत प्रवेश मिळणार आहेत.  

पॉइंटर 
अकरावी प्रवेशासाठी मार्गदर्शनपर वर्ग (बुधवार ता. २२ मे)
पुणे शहर विभाग : राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, सहकारनगर, सकाळी ११ ते १२
पर्वती, धनकवडी, स्वारगेट : राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, सहकारनगर, दुपारी १ ते २
पिंपरी, भोसरी विभाग : म्हाळसाकांत ज्युनियर कॉलेज, आकुर्डी, सकाळी ११ ते १२
सिंहगड विभाग : रावसाहेब पटवर्धन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, दांडेकर पुलाशेजारी, दुपारी १ ते २
शिवाजीनगर, औंध, पाषाण विभाग : मॉडर्न असेंब्ली हॉल, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर, दुपारी ३ ते ४
चिंचवड, निगडी विभाग : म्हाळसाकांत ज्युनिअर कॉलेज, आकुर्डी, दुपारी ३ ते ४
हडपसर विभाग : सी. बी. तुपे कन्याशाळा सभागृह, हडपसर, सायंकाळी ५ ते ६

गुरुवार २३ मे
कॅम्प, येरवडा विभाग : टाटा असेंब्ली हॉल, नौरोजी वाडिया कॉलेज, रुबी हॉल शेजारी, सकाळी ११ ते १२
कर्नेनगर, कोथरूड विभाग : कलमाडी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कर्वेनगर, दुपारी ३ ते ४

Web Title: Eleventh Online Admission Training Class