भोसेतील वटवृक्षासाठी पर्यावरणप्रेमींचा "झाड बचाव' चा एल्गार ; गुरूवारी  वारकऱ्यांचे आंदोलन 

अजित कुलकर्णी 
बुधवार, 15 जुलै 2020

सांगली-  भोसे (ता. मिरज) येथील खामकर वस्तीनजीक यल्लम्मा मंदिराशेजारचा वटवृक्ष वाचला पाहिजे, यासाठी पर्यावरण व वृक्षप्रेमींनी आवाज बुलंद केला आहे. आज सकाळी झाडानजीकच कार्यकर्त्यांनी "वटवृक्ष वाचवा' अशी आर्त साद घातली. झाडाच्या सभोवताली उभारुन कार्यकर्त्यांनी "झाड वाचलेच पाहिजे' अशा घोषणा दिल्या. स्थानिक नागरिक, कार्यकर्त्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान उद्या (ता.16) वारकरी संप्रदायातील लोक झाडानजीक आंदोलन करणार आहेत. 

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात खामकर वस्तीनजीक यल्लम्मा मंदिराशेजारी प्राचिन वटवृक्षाचा हटवला जात आहे. झाडाशेजारीच पुलाचे काम सुरु असल्याने सध्या तरी फांद्या तोडण्यात आल्या आहेत. सर्वेक्षण करताना मंदिर परिसराला धक्‍का न लावता झाडाचा बळी देण्यात आल्याने ग्रामस्थांसह परिसरातील जनतेने नाराजी व्यक्‍त केली. मात्र रस्ते बांधणी करणाऱ्या कंपनीने झाडाची कत्तल करत काम सुरुच ठेवल्याने जनक्षोभ वाढला.

दै. "सकाळ' ने सोमवारी (ता. 13) अंकात या झाडाचे अस्तित्व नष्ट होणार असल्याचे छायाचित्र प्रसिध्द केल्यानंतर राज्यभरातील पर्यावरण, वृक्षप्रेमींनी झाड वाचवण्यासाठी आंदोलनाची हाक दिली. आज सकाळी झाडाभोवती कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत घोषणाबाजी केली. अभिनेते सयाजी शिंदे व लेखक अरविंद जगताप यांच्या सह्याद्री देवराई परिवारसह अन्य संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. प्राचिन झाड तोडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. उपसरपंच मनोज पाटील, शिवाजी कोळी, दिनेश कदम, प्रवीण शिंदे, सागर बाबर, शुभम पाटील, विनायक मेंढे, परमवीर मोरे, प्रमोद कांबळे, राहूल गणेशवाडे, उमेश कदम यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले. 

संपादन : घनशाम नवाथे 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elgar's' Save the Tree 'of Environmentalists in Bhose