कॅशलेश व्यवहारावर प्रशासनाचा भर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर  : जिल्ह्यातील प्रत्येक गावात कॅशलेस बॅंकिंग सुविधा मिळाली पाहिज,. यासाठी प्रशासन पुढाकार घेणार आहे. जिल्ह्यात जेथे संग्राम प्रकल्प सुरू आहेत, तेथे पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे भरण्यासाठी वापरण्यात येणारी सुविधा कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकरारी नंदकुमार काटकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

11 एप्रिलपासून रिझर्व्ह बॅंक व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही प्रणाली सुरू केली आहे. ही सुविधा वापरून एका वेळी किमान 50 रुपये तर कमाल 1 लाख रुपये बॅंकेत भरता येणार आहेत. यासाठी लाभार्थींच्या बॅंकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासाठी कोणतीही माहिती आवश्‍यक नसणार आहे. युपीआय हे एखाद्या एसएमएस पाठविण्याइतके सोपे आहे. प्रत्येक बॅंकेचे मोबाईल ऍप आहे. त्यामुळे मोबाईलद्वारे व्यवहार करणे शक्‍य झाले आहे. यासाठी तुमचा मोबाईल नंबर बॅंक अथवा एटीएममध्ये रजिस्टर करावा लागणार आहे. युपीए ऍप मोबाईलवर डाऊनलोड करावे लागणार आहे. तुमच्या वैयक्तिक आयडी बनवावा लागले. पिन नंबर, तयार करून कोठेही व्यवहार करता येणार असल्याचेही श्री काटकर यांनी सांगितले.

जिल्हा बॅंकांनाही सवलत...
सहकारी बॅंकांना हजार-पाचशे रुपये नोटा बदलून देण्यास किंवा खात्यावर टाकण्यास बंदी केली आहे. दरम्यान, यामुळे अनेक शेतकऱ्यांना शिक्षक, लघुउद्योजकांना त्रास होत आहे. या पार्श्‍वभूमीवर 30 नोव्हेंबरला मुंबई येथे मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत यावर तोडगा निघून जिल्हा बॅंकेतही व्यवहार करता येतील, अशी शक्‍यता असल्याचेही काटकर यांनी सांगितले.

Web Title: emphasis on cashless transactions