esakal | कोरोना : भारतीय वस्तूंच्या विक्रीवर भर
sakal

बोलून बातमी शोधा

Emphasis on the sale of Indian goods due to corona

"कोरोना'च्या संकटामुळे सध्या चिनी वस्तू मिळत नाहीत. बाजारात त्यांना मोठी मागणी असते. त्यांच्या किमती वाढविल्यामुळे ग्राहकांना भारतीय वस्तू विकतो.

कोरोना : भारतीय वस्तूंच्या विक्रीवर भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचा परिणाम येथील खेळण्यांच्या बाजारावरही झाला आहे. चीनमध्ये तयार झालेल्या विविध वस्तूंची आयात महिनाभरापासून बंद असल्याने, चिनी वस्तूंच्या दरात 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. बाजारात चिनी वस्तू उपलब्ध होत नसल्याने येथील व्यापारी आता भारतीय वस्तूंच्या विक्रीवर भर देत असल्याचे सांगतात. येथील "चायना सेल'चे मालक गिरिधारी अच्छडा यांनी ही माहिती दिली. 

जाणून घ्या- चोरांची भीती, नागरिकांच्या हाती काठी! 

"कोरोना'च्या संकटामुळे सध्या चिनी वस्तू मिळत नाहीत. बाजारात त्यांना मोठी मागणी असते. त्यांच्या किमती वाढविल्यामुळे ग्राहकांना भारतीय वस्तू विकतो. सण, यात्रा, उत्सवाच्या काळात चिनी खेळण्यांची मोठी विक्री होते. गावागावांतील यात्रोत्सवात त्यांना मागणी असते. यंदा भारतीय खेळणी बाजारात असून, आमच्या गोदामात सध्या 70 टक्के भारतीय, तर 30 टक्के चिनी वस्तू आहेत. चिनी वस्तू प्रथम मुंबईत दाखल होतात व तेथून देशभरात त्यांची विक्री होते. 

चिनी वस्तू खरेदी-विक्रीचे प्रमाण थंडावले

श्रीरामपुरात खेळण्यांची 25 ते 30 प्रमुख दुकाने असून, वर्षाला 50 ते 60 लाखांची उलाढाल होते. भारतीय वस्तू खरेदी केल्यास व्यावसायिकांना पैसे देण्यास सवलत मिळते. चिनी वस्तूंसाठी मात्र रोख पैसे मोजावे लागतात. सरकारने त्यांच्या आयातीवरील कर 20 टक्‍क्‍यांवरून 60 टक्के केला. "कोरोना'सारख्या संकटात चिनी वस्तू खरेदी-विक्रीचे प्रमाण थंडावले आहे. रंगपंचमी जवळ आल्याने दिल्लीत तयार होणाऱ्या पिचकाऱ्यांना पसंती मिळत आहे. 

किमती 20 टक्‍क्‍यांनी वाढल्या

बाजारात रबरी खेळणी, रिमोटवरील कार, चिनी बॅटरी, मोठ्या कार, मोबाईलचे सुटे भाग, बार्बी बाहुल्या, विद्युत बोर्ड, टेस्टर, बॉल, जेसीबी या वस्तूंच्या किमती 20 टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. 

loading image