निवडणूक प्रशिक्षणास कर्मचाऱ्यांची दांडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

महापालिका निवडणूक कामकाजाच्या प्रशिक्षणास गैरहजर 39 अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी या सर्वांना पुढील 24 तासांत खुलासा करा अन्यथा पोलिस कारवाईस तयार राहा, असा इशारा दिला आहे. गेल्या शनिवारी सांगली-मिरजमध्ये प्रशिक्षण झाले होते. 

सांगली - महापालिका निवडणूक कामकाजाच्या प्रशिक्षणास गैरहजर 39 अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी या सर्वांना पुढील 24 तासांत खुलासा करा अन्यथा पोलिस कारवाईस तयार राहा, असा इशारा दिला आहे. गेल्या शनिवारी सांगली-मिरजमध्ये प्रशिक्षण झाले होते. 

या प्रशिक्षणास 21 मतदान केंद्रप्रमुख, मतदान अधिकारी क्रमांक एकचे 7, दोनचे 1, तीनचे 10 असे 39 कर्मचारी-अधिकारी गैरहजर होते. त्यात सामाजिक वनीकरण, कृषी, बांधकाम, शिक्षण, महसूल आदी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इचलकरंजी, शिरोळ, पलूस, आष्टा, तासगाव येथील शासकीय विभागातील कर्मचारी आहेत.

दरम्यान, निवडणूक कामासाठी सुमारे साडेतीन हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले. पुढील टप्प्यातील प्रशिक्षण रविवारी (ता. 22) आहे. त्यासाठी सर्वांनी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार थेट कारवाई केली जाईल, असेही खेबुडकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Employee stick to election training