नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

मंगळवेढा (सोलापूर) : नगराध्‍यक्षा अरुणा माळी यांचा मनमानी कारभार, खोट्या तक्रारी, प्रमाणकावर स्‍वाक्षरीसाठी अडवणूक करणे व प्रशासकीय कामांतील हस्‍तक्षेपास कंटाळून कर्मचाऱ्यांनी 8 मेपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्‍याचा इशारा निवेदनाद्वारे दिला.

निवेदनाच्‍या प्रती प्रधान सचिव सो. मा. आयुक्‍त तथा संचालक, प्रादेशिक उपसंचालक. जिल्‍हाधिकारी यांना दिल्‍या असून यावर 19 कर्मचाऱ्याच्या सह्या आहेत यामध्ये म्हटले आहे की प्रशासकीय कामांत हस्‍तक्षेप करण्‍याचे अधिकार नगराध्‍यक्षांना नाहीत तरीसुध्‍दा गेल्‍या अडीच वर्षापासून सतत प्रशासकीय कामांत हस्‍तक्षेप करुन दिलेल्‍या लेखी तक्रारीस कर्मचारी वर्ग वैतागून गेला, कर्मचाऱ्यांविरुध्‍द अशासकीय भाषेत पत्र व्‍यवहार केले बाबत कित्‍येक कर्मचाऱ्यांना नोटीसा देणे, निलंबीत करा, चौकशी करा, गुन्‍हे दाखल करा अशा स्‍वरुपाचे अर्ज देवून मानसिक त्रास दिल्याबाबत ठराव करुन तांत्रिक मंजूरी घेवून प्रशासकीय मंजूरी घेवून कार्यादेश दिल्‍यानंतर व कामांचे बिल अदा करते वेळी सदर काम चुकीचे आहे म्‍हणून तक्रारी करुन नगराध्‍यक्षा अडचण निर्माण करत असून सभा वेळेत न घेणे व प्रोसिडींग बुकात वेळेवर स्‍वाक्षरी न करणे, सतत प्रमाणके व सीसीटीव्‍ही फुटेज मागणी करणे, स्‍वतःच्‍या केबिनची चावी खाजगी व्‍यक्‍तीच्‍या ताब्‍यात देऊन दहशत बसविणे अशा 58 लेखी तक्रारी दिल्या.  

विकास कामापेक्षा रोजच्‍या तक्रारी निर्गत करता करता कोणतीच विकास कामे  पूर्ण होत नाही विद्यमान मुख्‍याधिकारी श्रीम. पल्‍लवी पाटील यांचे विरुध्‍द खोटया तक्रारी दिल्‍या आहेत. नगराध्‍यक्षांच्‍या हट्टी व मनमानी कारभारामुळे नागणेवाडी तलाव सुशोभिकरण, कुंभार तलाव सुशोभिकरण, गॅस शवदाहिनी, स्‍वच्‍छ सर्वेक्षणातील कामांची बिले, शहरांतील अतिक्रमण नियमानुकूल करणे बाबत झालेल्‍या कार्यवृत्‍तावर स्‍वाक्षरी न करता गोरगरीब लोकांना शासनाच्‍या योजनेपासून वंचित ठेवणे, विविध विकास कामांच्‍या झालेल्‍या ठरावाच्‍या इतिवृत्‍तावर स्‍वाक्षरी न करता विकास कामा ची अडवणूक करणे, असे अनेक  प्रकारांच्‍या कामावर तक्रारी व अडवणूक सुरु आहे.नगराध्‍यक्षां ठराविक मर्जीतील ठेकेदाराच्‍या प्रमाणकांवर स्‍वाक्षरी करतात व कांही कर्मचारी व कांही ठेकेदारांची नाहक अडवणूक करतात, नगराध्‍यक्षांच्‍या पतीचा शासकीय कामांतील हस्‍तक्षेपास आळा न घालता पाठीशी घातलेले निवेदनात नमुद केले.

भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांच्या दोन ठिकाणी पगारी काढल्यामुळे आपण लेखी तक्रार केली यावरून हे कर्मकांड रचले असून आपण केलेल्या तक्रारीची उत्तरे लिखी देणे अपेक्षित आहे परंतु काम बंद आंदोलन करून करणे हा पर्याय होऊ शकत नाही कर्मचारी हे ठेकेदार नसतात त्यामुळे त्यांची बिले अडवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पालिकेत भ्रष्टाचार कमी करण्याचा आपला प्रयत्न आहे.माझ्याविरूद्ध कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
- अरुणा माळी, नगराध्यक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com