तरुणांसाठी रोजगार ही मोदी सरकारची सर्वोच्च प्राथमिकता: खासदार साबळे

प्रशांत चवरे
शनिवार, 5 मे 2018

भिगवण - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व इंदापुर पंचायत समिती यांचे संयुक्त विदयमाने तक्रारवाडी (ता.इंदापुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन खासदार अमर साबळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यसभेचे खासदार अमर साबळे बोलत होते. 

भिगवण - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व इंदापुर पंचायत समिती यांचे संयुक्त विदयमाने तक्रारवाडी (ता.इंदापुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन खासदार अमर साबळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यसभेचे खासदार अमर साबळे बोलत होते. 

सत्ता गेल्यामुळे व पुन्हा सत्ता येण्याची शक्यता नसल्यामुळे विरोधक मोदी सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना बदलत असल्याचा अपप्रचार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर राज्यघटना हाच या देशाचा धर्मग्रंथ असुन देश मनुस्मृतीनुसार नव्हे तर भीमस्मृतीनुसार चालेल याची ग्वाही देशातील जनतेला दिली आहे. त्यानुसार देशातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासुन कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा युवकांना लाभ घ्यावा असे आवाहननही यावेळी साबळे यांनी केले.   

सभापती करणसिंह घोलप, भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मारुती वणवे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, तहसिलदार श्रीकांत पाटील, नानासाहेब शेंडे, ज्ञानदेव चवरे, तानाजी थोरात, रामचंद्र निंबाळकर, ज्ञानेश्वर मारकड, रमेश खारतोडे, सरपंच शोभाताई वाघ, उपसरपंच प्रशांत वाघ यावेळी उपस्थित होते. 

खासदार साबळे म्हणाले, देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणे ही मोदी सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असुन, त्यासाठी मेक इंडिया, कौशल्य विकास यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशातील महिलांना दिलासा देण्यासाठी उज्वला गॅस योजना, आरोग्य विमा, स्वच्छ भारत अभियान, रोजगारासाठी मुद्रा योजना अशा लोकोपयोगी योजना राबविल्या आहेत.  

करणसिंह घोलप म्हणाले, भारत हा युवकांचा देश आहे. परंतु, जोपर्यंत या युवकांना कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात नाही तोपर्यंत तरुणांना रोजगाराची संधी मिळणार ऩाही. शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या अशा उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांना कौशल्य विकासाचे महत्व पटण्यास निश्चित मदत होईल. यावेळी यावेळी सुशीलकुमार लिलारिया, शुभांगी पवार, गणेश खामगळ, हसीना मुजावर या तज्ञ मार्गदर्शकांनी युवकांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी माणिकराव बुचकुले यांनी केले सुत्रसंचालन देवानंद शेलार यांनी केले. आभार प्रर्दशन किरण मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन केंद्र प्रमुख नानासाहेब दराडे, मुख्याध्यापक राजेश नाचण, ग्रामसेवक रविंद्र शेलार यांनी केले.

Web Title: Employment for youth is the highest priority of Modi Government - sable