पक्की अतिक्रमणे भुईसपाट  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

अहमदनगर : अमहदनगर-पुणे रस्त्यावरील सीना नदी पात्रा लगतच्या अतिक्रमणांवर आज दुसऱ्या दिवशीही महसूल व पाटबंधारे विभागाने कारवाई करत पक्‍की अतिक्रमणे जमीनदोस्त केली. या कारवाईला शिल्पा गार्डनच्या मालकांनी विरोध केला. मात्र, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर कारवाईवर ठाम राहत आनंद सेल्स, भारत मार्बल, एक पूर्व प्राथमिक शाळेच्या नऊ खोल्या व शिल्पा गार्डनचे चौथा अतिक्रमण जमीनदोस्त केले. 

आज सकाळी आठ वाजताच प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर पथकासह शिल्पा गार्डन समोर आल्या. त्यांच्या पथकात तहसीलदार आप्पासाहेब शिंदे, नायब तहसीलदार अर्चना भाकड-पागिरे, नायब तहसीलदार वैशाली आव्हाड, मंडलाधिकारी राजेंद्र आंधळे, मंडलाधिकारी रिझवान शेख यांसह दोन पोकलेनचा समावेश पोलिस बंदोबस्त होता.
 
Web Title: encroachment by the pune-ahmadnagar highway