अंबाबाई मंदिरातील अतिक्रमण हटवले

अंबाबाई मंदिरातील अतिक्रमण हटवले

कोल्हापूर -  अंबाबाई मंदिर आवारातील दुकानदारांनी ओवऱ्यांच्या बाहेर केलेले अतिक्रमण आज देवस्थान समितीच्या वतीने हटवण्यात आले. दुकानांत केवळ पूजेचे साहित्यच ठेवले जावे. इमिटेशन ज्वेलरी, खेळणी आदी वस्तू ठेवल्या जाऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे आदींच्या उपस्थितीत ही कारवाई झाली. 

समितीने गेली महिनाभर महापालिकेच्या सहकार्याने अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महाद्वार परिसरातील सर्व अतिक्रमणे हटवली. मंदिर आवारातील दुकानदारांना पुढील अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याची कार्यवाही झालेली नव्हती. आज समितीने कारवाई सुरू करून साहित्य जप्त करण्यास प्रारंभ करताच सर्व दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे काढली. मंदिर परिसरातील लॉटरीचे दुकान बंद करून तेथे देवीच्या ओटीचे साहित्य ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली. घाटी दरवाजा परिसरातील दुकानदारांनाही अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी तत्काळ अतिक्रमणे न काढल्यास समितीने कारवाईचा इशारा दिला आहे. या दुकानदारांचे पुनर्वसन करण्याचा विचार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. मणकर्णिका कुंड परिसराची जागा देवस्थान समितीची असून हे कुंड खुले करण्याबरोबरच कुंडाची जागा सोडून पूर्वेला स्वच्छतागृह उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com