अतिक्रमणांवर आता अभियंत्यांचे लक्ष!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

साताऱ्यात ‘सीईओं’नी सोपवली जबाबदारी; अतिक्रमणविरोधी विभाग सक्षम होण्याची अपेक्षा

सातारा - पालिकेच्या अतिक्रमण विभागाची जबाबदारी आता त्या- त्या भागातील कनिष्ठ अभियंत्यांवर असणार आहे. याबाबतचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी नुकतेच संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे अतिक्रमण विरोधी विभाग अधिक सक्षमपणे काम करेल, अशी सर्वसामान्य अपेक्षा आहे. 

साताऱ्यात ‘सीईओं’नी सोपवली जबाबदारी; अतिक्रमणविरोधी विभाग सक्षम होण्याची अपेक्षा

सातारा - पालिकेच्या अतिक्रमण विभागाची जबाबदारी आता त्या- त्या भागातील कनिष्ठ अभियंत्यांवर असणार आहे. याबाबतचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी नुकतेच संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे अतिक्रमण विरोधी विभाग अधिक सक्षमपणे काम करेल, अशी सर्वसामान्य अपेक्षा आहे. 

पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागात अवघे दोन कर्मचारी काम करतात. अतिक्रमण हटविण्याची कारवाई करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बिगाऱ्यांना मदतीला घेतले जाते. खर तर हा विभाग पूर्णवेळ कार्यरत ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, अतिक्रमणांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार गेल्यानंतरच त्यावर कारवाई केली जाते. ऐरवी पालिकेने स्वत:हून दखल घेऊन कारवाई केल्याची उदाहरणे विरळच. हा अनुभव लक्षात घेऊन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी आता अतिक्रमण विभागाची जबाबदारी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांवर निश्‍चित केली आहे. 

कंत्राटीपद्धतीवर पालिकेकडे असलेल्या चार अनुभवी कनिष्ठ अभियंत्यांकडे हे काम देण्यात आले आहे. अतिक्रमणविरोधी विभागातील दोन कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना अतिक्रमण निर्मूलनाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. या विभागाला अभियंत्यांच्या अनुभवाची जोड मिळाल्यामुळे आता अतिक्रमण विरोधी विभाग अधिक सक्षमपणे काम करेल, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. प्रशासनाने चांगल्या उद्देशाने पाऊल उचलले आहे. अर्थात त्यात सातत्य किती राहते, कर्मचारी आपली जबाबदारी गांभीर्याने ओळखतील का, कारवाईत राजकीय हस्तक्षेप टाळणे आदींवरच अतिक्रमण विरोधी विभागाचे यश अवलंबून राहणार आहे. 

राजवाडा चौपाटी स्थलांतर
गांधी मैदानावर वर्षानुवर्षे भरणाऱ्या राजवाडा चौपाटीचे स्थलांतरण करण्याचे नियोजन सुरू आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी साताऱ्यात प्रथम राजवाड्यापुढे, शिक्षण मंडळाच्या दारात खाऊचे काही गाडे उभे राहू लागले. प्रतापसिंह उद्यानामुळे काहींनी भेळीच्या गाड्या सुरू केल्या. सुमारे १७ वर्षांपूर्वी चायनीजच्या पदार्थांच्या गाड्या सुरू झाल्या. हळूहळू करत आज चौपाटीवरील गाड्यांनी शंभरी गाठली आहे. ही चौपाटी मध्यवर्ती बॅंकेलगत, प्रतापगंज पेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर (आळूचा खड्डा) हटविण्याचे नियोजन आहे. त्याठिकाणी सपाटीकरण, गरजेनुसार विस्तारीकरण, वीज, पाणी, पेव्हर आदी सुविधा निर्माण करण्याचे पदाधिकाऱ्यांचे नियोजन असल्याचे समजते.

Web Title: encroachment watch by engineer