Engineer dead for trekking duration in rajgad
Engineer dead for trekking duration in rajgad

ट्रेकिंगदरम्यान इस्लामपूरच्या अभियंत्याचा मृत्यू 

इस्लामपूर (कोल्हापूर) : ट्रेकिंग करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील राजगड येथे गेलेल्या वाळवा तालुका इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष विकास बिरुदेव गावडे (वय ४८) यांचे आज सकाळी अकराच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सामाजिक, सहकार आणि विविध क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या गावडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरावर शोककळा पसरली.

 विकास गावडे इंजिनियर्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष होते. कालच या संघटनेची बैठक झाली आणि आज पहाटे तीनच्या सुमारास संघटनेचे सर्व सदस्य मिळून ट्रेकिंगसाठी गेले होते. साडे दहाच्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि यातच अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. उपचाराला नेण्यापूर्वीच ही घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला. विकास गावडे गव्हर्नमेंट रजिस्टर्ड इंजिनियर होते. तालुका अभियंता संघटना तसेच क्रेडाई व जायंट्स ग्रुप, आसमंत फौंडेशनमध्येही सक्रिय होते. वडील बिरुदेव गावडे यांच्या नावाने त्यांनी पेठ (ता. वाळवा) या त्यांच्या मूळ गावी पतसंस्था स्थापन केली होती. ते शेती आणि पोल्ट्रीचाही व्यवसाय करत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com