अभियांत्रिकी पदवीसाठी दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश

Online-Admission
Online-Admission

सातारा - इयत्ता बारावी आणि आयटीआय झाल्यानंतर अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश देण्यात येतो. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी शेवटचे दोन दिवसच (२१ जून) ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी राहिले आहेत. यामध्ये प्रवेशासाठी आवश्‍यक असणारी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आणि अर्जाची पडताळणी आणि निश्‍चिती करण्यासाठी ही २१ जूनपर्यंत मुदत आहे. 

प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी (कॅप) महाविद्यालयांचे पर्याय भरताना विद्यार्थ्यांनी ‘ऑटोफ्रिज’ किंवा ‘सेल्फफ्रिज’ पर्याय निवडल्यानंतर, त्यांना पहिल्या क्रमांकाचे महाविद्यालय मिळाल्यास त्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असून, इतर प्रवेश फेरीत सहभागी होता येणार नाही. या प्रवेशाचा ‘कट ऑफ’ हा १४ ऑगस्टला जाहीर होईल, असे तंत्रशिक्षण संचालनालयाने कळविले आहे. या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला थेट 
प्रवेश घेण्यासाठी तीन प्रवेश फेऱ्या होणार आहेत. अधिक माहिती www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

पहिली प्रवेश फेरी
  प्रवेशासाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : २७ जून 
  महाविद्यालयांचे पर्याय भरणे : २८ जून ते १ जुलै 
  प्रोव्हिजनल ॲलॉटमेंट जाहीर करणे : ३ जुलै 
  प्रवेश निश्‍चित करणे : ४ ते ७ जुलै 
  प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन शुल्क भरून प्रवेश घेणे : ४ ते ८ जुलै 

दुसरी प्रवेश फेरी 
  प्रवेशासाठी रिक्त जागा जाहीर करणे : १० जुलै 
  महाविद्यालयांचे पर्याय भरणे : ११ ते १४ जुलै 
  प्रोव्हिजनल ॲलॉटमेंट जाहीर करणे : १६ जुलै 
  प्रवेश निश्‍चित करणे : १७ ते २० जुलै 
  महाविद्यालयांत शुल्क भरून प्रवेश : १७ ते २१ जुलै 

तिसरी प्रवेश फेरी 
  प्रवेशासाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : २३ जुलै 
  महाविद्यालयांचे पर्याय भरणे : २४ ते २७ जुलै 
  प्रोव्हिजनल ॲलॉटमेंट जाहीर करणे : ३० जुलै 
  प्रवेश निश्‍चित करणे : ३१ जुलै 
  महाविद्यालयात जाऊन शुल्क भरून प्रवेश घेणे : ३१ जुलै ते ४ ऑगस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com