अभियांत्रिकी कॉलेज कॅशलेस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

कऱ्हाड - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडिया संकल्पनेला प्रतिसाद देत येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कॅशलेस व डिजिटल बनले आहे. महाविद्यालयात विद्यार्थी असो वा प्राध्यापकांचे सर्व व्यवहार ऑनलाइन होत असल्याने एक रुपयांची रोकड देणे- घेण्याचा व्यवहाराला पूर्णतः आळा बसल्याचा दावा महाविद्यालय करत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कॅशलेस व डिजिटल महाविद्यालय म्हणून नव्याने ओळख निर्माण होऊ लागली आहे. 

स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळवलेल्या येथील शासकीय अभियांत्रिकी महाद्यिालयाने तत्कालीन प्राचार्य डॉ. पी. एम. खोडकेच्या नेतृत्वाखाली कायापालट केला. त्यात डिजिटल समन्वयकाची जबाबदारी दिलेल्या प्रा. लक्ष्मण कुमारवाड यांनी महाविद्यालय कॅम्पस डिजिटल व कॅशलेस करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यासाठी खर्चिक असलेल्या सॉफ्टवेअरची खरेदी करण्यात आली. त्याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांचे लॉगिंन देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांला महाविद्यालयाचे शुल्क भरायचे असो वा मेस, ग्रंथालयाचे शुल्क भरायचे असो त्यासाठी लागणारी रक्कम रोख देण्यापेक्षा त्याच्या खात्यातून संबंधित सॉफ्टवेअरद्वारे महाविद्यालयाच्या खात्यात जमा होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात सर्व व्यवहार यशस्वीपणे पूर्णत्वास गेल्याने महाविद्यालय खरोखरच कॅशलेस व डिजिटल बनले आहे. केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हेत, तर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा पगार, महाविद्यालयाचे एखादे किरकोळ काम केले तरी त्याचे बिल डिजिटल केले जात असल्याने महाविद्यालच्या कॅशिअरला रक्कम मोजायची, त्यात ५००, दोन हजारांच्या नोटा किती बनावट सापडतात, याची भीती बाळगण्याची चिंता नाही. संबंधित सॉफ्टवेअरवर रक्कम जमा झाली का पाहणे इतकेच काम राहिले आहे.

महाविद्यालय कॅशलेस व डिजिटल झाल्याने विद्यार्थी, पालकांसह महाविद्यालयाची सोय झाली आहे. डिजिटलबरोबरच कार्यालय पेपरलेस होण्यास मदत झाली आहे.
- प्रा. लक्ष्मण कुमारवाड, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कऱ्हाड

Web Title: engineering college cashless