अभियांत्रिकी कॉलेजच्या दर्जावर रोजगार संधी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

सांगली - अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा हा यापुढच्या काळात रोजगाराच्या संधीसाठी खूपच महत्त्वाचा निकष असेल, असे मत चेन्नईच्या एस. आर. एम. युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकलचे सहायक प्राध्यापक शुब्रजित भौमिक यांनी व्यक्त केले. "सकाळ विद्या' व एसआरएम विद्यापीठातर्फे व्हाईट हाऊस येथे आयोजित "अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर व प्रवेश प्रक्रिया' या विषयावर चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. "सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी चर्चासत्राचे उद्‌घाटन केले. या वेळी प्राचार्य एम. एस. रजपूत यांचीही उपस्थिती होती. 

प्रा. भौमिक म्हणाले, ""प्रवेशाआधीच पुरेशी दक्षता घेतली पाहिजे. आपल्याला हवा तो विभाग त्या विद्यापीठात आहे. त्यातील पुढच्या संधी आहेत हे पाहावे. महाविद्यालयाचा कॅम्पस सुविधांकडेही लक्ष द्यावे. पदवीनंतरच्या जॉबच्या संधी, जागतिक स्तरावर त्या विद्यापीठाचे मानांकन या बाबीबाबत विद्यार्थ्यांनी सजग असले पाहिजे. एसआरएम या विद्यापीठात प्रवेशासाठी ऑनलाईन परीक्षा येत्या 1 ते 30 एप्रिलला होणार आहे. मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे या परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख 1 मार्च आहे. खास बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेश परीक्षेची तारीख स्वतःच्या सोयीप्रमाणे ते निवड करू शकतात. प्रवेश फॉर्म काळजीपूर्वक घ्यावा. प्रवेश घेताना पालकांनी मुलांचे मत विचारात घेणे आवश्‍यक आहे. एस. आर. एम. विद्यापीठामध्ये बी.टेक. इंजिनिअरिंगच्या सोळा शाखा उपलब्ध आहेत.'' 

प्रा. रजपूत म्हणाले, ""सीईटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शासकीय कॉलेज व खासगी महाविद्यालयांच्या जागा भरल्या जातात. त्या 85 टक्के जागा आहेत. या सर्व कॉलेजमध्ये सीईटीच्या माध्यामातून प्रवेश होणार आहे. विद्यार्थ्यांना जर आयआयटी व एनआयटी प्रवेश हवा असेल तर जेईई परीक्षा द्याव्या लागतील. ही परीक्षा 11 वी व 12 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते.'' 

यिन प्रतिनिधी पौर्णिमा उपळावीकर यांनी प्रास्ताविक केले. "सकाळ'चे जाहिरात व्यवस्थापक उदय देशपांडे, वितरण व्यवस्थापक संजय पवार, जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब नागरगोजे व राहुल कुलकर्णी उपस्थित होते. इव्हेंट प्रमुख परितोष भस्मे यांनी कार्यक्रमाचे आयोजन व आभार मानले.

Web Title: Engineering college level employment opportunities