पेपर अवघड गेल्याने अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या  

धनाजी आरडे
शनिवार, 15 डिसेंबर 2018

गारगोटी - अभियांत्रिकी सत्र परीक्षेचे पेपर अवघड गेल्याने नापास होण्याच्या भीतीने येथे एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमृता तानाजी लोहार (वय 20, मूळ गाव आकुर्डे ता. भुदरगड) असे तिचे नाव आहे. याबाबतची भुदरगड पोलिसात नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आकुर्डे (ता. भुदरगड) येथील तानाजी लोहार हे गारगोटी येथील इंजूबाई काॅलनी येथे कुंटुंबियांसमवेत भाड्याच्या घरी राहतात. त्यांची  मुलगी अमृता ही अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत होती. सत्र परीक्षेचे पेपर अवघड गेल्याने ती तणावाखाली होती. यातूनच तिने घरी कोणी नसल्याचे पाहून छताच्या हूकला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अनिल विलास लोहार यांनी फिर्याद दिली. भुदरगड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Engineering student Amruta Lohar suicides due to paper difficult