इंग्रजी शाळांचा गाडा रुतलेलाच ; पालकांचीही ऑनलाईन शिक्षणाला पसंती

english medium schools faced same problem for education parents also approved for online education in sangli
english medium schools faced same problem for education parents also approved for online education in sangli

सांगली : नववी ते बारावीचे वर्ग भरवण्यासाठी शासन आदेश आल्यानंतर सरकारी शाळांची मोठी लगबग सुरू असताना इंग्रजी माध्यमांच्या शाळा मात्र सावधपणे पाऊले टाकताना दिसत आहे. इंग्रजी माध्यमातील मुलांचे पालक अधिकच चिंतेत असून संस्थाचालकांनी पुढे काय होतंय याचा कानोसा घेत शाळा सुरू ठेवल्या आहेत. 

इंग्रजी शाळांवर सरकारचे थेट नियंत्रण नाही. पालकांकडून मिळणाऱ्या फी वरच या शाळांची भिस्त असते. त्यामुळे शासनाच्या सूचनांपेक्षा पालक काय म्हणतात हे या शाळांसाठी अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे या शाळांनी पालक शिक्षक समितीच्या सदस्यांच्या सूचना मागवल्या आहेत. बहुतेक ठिकाणी नववी-दहावी या दोन वर्ग सुरू करण्याचाच विचार सुरु आहे. शाळा सुरू करताना अनेक शाळांसमोर वाहतूक व्यवस्था, काही शाळांना मेसचीही व्यवस्था यांचा विचार करावा लागणार आहे. त्यासाठीचे आर्थिक गणित बसवयाचे तर वर्गात किती मुले येणार हेही महत्त्वाचे आहे.

पालक मंडळी अतिसंवेदनशील. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्‍यतेमुळे अनेक पालकही संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे इंग्रजी शाळांचा गाडा मंदगतीने पुढे सरकताना दिसत आहे. त्याचवेळी इंग्रजी शाळांनी गेले आठ महिने ऑनलाईन अध्यापन नेटाने सुरू ठेवले आहे. सध्याच्या या धामधुमीतही त्यांनी त्यात खंड पडू दिलेला नाही. 

फी बाबतही संभ्रमावस्था 

इंग्रजी शाळांपुढे फी वसुलीचा गंभीर प्रश्‍न आहे. अनेक शाळांनी स्वतःहून पन्नास टक्के फी तरी भरावी अशी सवलत दिली. मात्र पालकांनी ती भरण्याबाबतही असमर्थता दर्शवली आहे. जवळपास पन्नास टक्के पालकांकडून फी मिळाली नसल्याची संस्थाचालकांची तक्रार आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा गाडा अक्षरक्षः रुतला आहे. 

"आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची उपस्थिती बरी आहे. मात्र नववी, दहावी वर्गात मात्र नगण्य उपस्थिती आहे. पालक भीतीच्या छायेत आहेत. ऑनलाईन वर्ग मात्र नियमित सुरू आहेत.'' 

- कपिल राजपूत, राजपूत इंग्लिश मीडिअम स्कूल 

"विद्यार्थ्यांची उपस्थिती बरी आहे. वर्ग भरत आहे. सुरक्षा साधने वापरून वर्गात उपस्थित वाढवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.'' 

- सागर बिरनाळे, आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com