वादग्रस्त घरकुल लाभार्थींची शिराळे-वारुणमध्ये चौकशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

तुरुकवाडी - शिराळे-वारुण (ता. शाहूवाडी) येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील वादग्रस्त पात्र लाभार्थींची चौकशी आज शाहूवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी केली. दैनिक सकाळने गुरुवारी "शिराळे-वारुण घरकुल यादीत फेरफार' या मथळ्याखालील वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालील चौकशी समितीने घरकुल यादीतील लाभार्थींच्या घरांची व इतर तपासणी केली.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ग्रामपंचायतीने संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठविले होते. यापैकी 16 लाभार्थी पात्र असल्याची यादी ग्रामपंचायत स्तरावर प्राप्त झाली. 16 लाभार्थी यादीमध्ये संजय पोळ यांच्या नावाचा समावेश होता. मात्र पात्र लाभार्थी यादीमधून आपणास राजकीय द्वेषापोटी डावलल्याचा आरोप पोळ यांनी गटविकास अधिकारी उदय पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करून आपणास न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पोळ यांनी दिला होता.

एकाच कुटुंबातील तीन लाभार्थी असून त्यांच्या नावे साधी घरे असल्याची नोंद ग्रामपंचायत दप्तरी आहे. शिधापत्रिका विभक्त असणे आवश्‍यक आहे. कागदोपत्री अडचण असल्याने गरज असतानाही लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित आहेत.
- रामचंद्र पाटील, सरपंच

आक्षेप किंवा हरकतीसाठी कालावधी दिला होता; मात्र या कालावधीमध्ये शिराळे-वारुणमधून हरकती आल्या नव्हत्या. आज वादग्रस्त लाभार्थींच्या कुटुंब, घराची व इतर चौकशी केली आहे. संबंधित लाभार्थींकडून फॉर्मद्वारे आवश्‍यक माहिती मागवली असून मंगळवारपर्यंत मुदत दिली आहे. चौकशीनंतर योग्य लाभार्थी निवडले जातील. कोणावरही अन्याय होणार नाही.
- डॉ. उदय पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती शाहूवाडी.

Web Title: Enquiry of beneficiaries of Gharkul Scheme